पाचोरा : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ना.नवाब मलिक यांना केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालयाने दाऊद इब्राहिमच्या भावाशी मालमत्ता खरेदीचा व्यवहार केल्याच्या आरोपावरून ताब्यात घेऊन,तपासणी चौकशीचे नाटक रंगवून तुरुंगात डांबण्याच्या कारवाईचा पाचोरा व भडगाव राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज सकाळी तीव्र जाहीर निषेध आणि धिक्कार करण्यात आला.
यानिमित्ताने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले व प्रवेशव्दारासमोर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी नवाब मलिक यांंच्या अटकेचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ,नगरसेवक भूषण वाघ,विकास पाटील,सुनील पाटील, रंजित पाटील, अझहर खान, भोला चौधरी, रसूल शेख,बंटी महाजन, वासुदेव महाजन, शालिकराम महाजन आदी कार्यकर्ते उपस्थित होते
महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा हा डाव आहे. केंद्रात सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरणाऱ्या सरकारची ही दहशत निर्माण करण्यासाठी केलेली कारवाई आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळणारे अपयश आणि केंद्रातल्या कारभारामुळे जगभरात होणारी नाचक्की यासंबंधी ना. मलिक यांनी केंद्राला वारंवार लक्ष्य करणे हीच या अटके मागील खरी कारणे आहेत. विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी उचललेले हे दहशत निर्माण करणारे पाऊल असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे.
