पाचोरा, प्रतिनिधी । शहरात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अधून मधून दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडल्याचे चित्र दिसत आहे, शहरातील हॉस्पिटलमध्ये आजारी कुटुंबीयांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. लहान मुलांसाठी हे वातावरणात खूप धोक्यात असल्याचे वृत्ताने नागरिकांन मध्ये आरोग्यची बाबत भीती निर्माण झाली आहे. पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी सो शोभा बाविस्कर यांच्या कडे पदभार असल्याने प्रशासन हे पूर्णत कोलमडून पडल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
पालिकेत गेल्या दहा वर्षांपासून *शिवसेना सतेत आहे. प्रमुख लोकप्रतिनिधींच्या विरोधात शहरवासीयांनी शिवसेनेकडे आत्मविश्वासाने सत्ता सोपवली आहे. कारण शहरांतील नागरिकांना अपेक्षा असणाऱ्या मूलभूत सुविधा तरी योग्य मिळाव्यात असा आत्मविश्वास जनतेला आहे . शहरात विविध विकास हा झपाट्याने होत आहे पण दैनंदिन होणाऱ्या मूलभूत सुविधा मिळवण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत…? या कडे लोकप्रतिनिधी व मुख्य प्रशासन यंत्रणाचे नगरसेविकाचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून होणारा पाणीपुरवठा हा अधून मधून दूषित होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येत आहे. गोरगरिबांना हातमजुर यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो एकीकडे साथीचे आजार येत आहे त्यात कोरोना संसर्ग ही अजून गेलेला नाही, आणि पाचोरा शहराच्या मध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे पाचोरा शहर वाशिया साठी गिरणा डॅम मधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो, त्या’ नदीमध्ये’ मुबलक पाणी असताना. दुसरीकडे नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी शासनातर्फे लाखो रुपये खर्च करण्यात आले.तरी अशुद्ध पाणी पुरवठा होतो कसा. असा प्रश्न शहरवासीयांना पडलेला आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी व मुखप्रशासन यांनी पाणीपुरवठा विभागाकडे दुर्लक्ष केलं आहे ..? दुसरीकडे पावसाचे दिवस सुरू आहे. आणि यावर्षी नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात देखील पूल आले आहे. या मुळे पाणी पुरवठा यंत्रणा कडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजेत कदाचित पाणीपुरवठा विभागात नियोजन चुकीचे होत असेल तर ते तपासा पाणी पुरवठा विभागात गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. सत्ताधारी नगरसेवक प्रतिनिधींनी पाणी पुरवठा बाबत गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.शहरवासीयांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.