Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पाचोरा ते जामनेर रेल्वे मार्गाचे होणार रुंदीकरण
    पाचोरा

    पाचोरा ते जामनेर रेल्वे मार्गाचे होणार रुंदीकरण

    saimat teamBy saimat teamFebruary 4, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : गणेश शिंदे

    तालुक्याला लागूनच असलेल्या जळगाव जिल्ह्यातून धावणार्‍या पी.जे रेल्वे मार्गाचा रुंदीकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेवून याबाबत नवीन अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. या निर्णयामुळे सोयगाव तालुक्याला दिलासा मिळाला आहे.

     

    सोयगाव परिसरातून फास्ट मुंबईला जाण्यासाठी आधार ठरलेली पाचोरा ते जामनेर रेल्वे मार्गाचे आता रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नवीन अर्थसंकल्पात या रुंदीकरणाची तरतूद करण्यात आली आहे.त्यामुळे आता पाचोरा-जामनेर पी.जे रेल्वे अधिक जोरात होणार असल्याने सोयगावकरांचा मुंबई प्रवास अधिक फास्ट होणार आहे. पाचोरा आणि जामनेर या दोन तालुक्यांना जोडणारा पी.जे रेल्वे मार्गाचे आता रुंदीकरण करण्यात येणार आहे.

    पाचोरा-जामनेर ही पी.जे रेल्वे सोयगाव तालुक्याच्या सीमारेषेवरून धावते त्यामुळे या पी.जे रेल्वेचा सोयगाव परिसरातील जरंडी,माळेगाव,पिंपरी आणि कंकराळा,निंबायती या परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होतो.सोयगाव शिवाराच्या हाकेच्या अंतरावर या पी,जे रेल्वेचे स्थानके आहे.त्यामुळे हा मार्ग जणूकाही सोयगाव तालुक्यातूनच धावतो अशी भावना आहे.जुन्या काळापासून सोयगाव परिसरातील ग्रामीण भागातील पाचोरा आणि जामनेर जाण्यासाठी या पी.जे रेल्वेचा उपयोग घेतात त्यामुळे ही पी,जे रेल्वे सोयगावकरांसाठी पर्वणी ठरली आहे.मीटरगेज मार्ग असलेल्या या पी.जे रेल्वेच्या मार्गाचे ब्रॉडगेज मार्गात रुपांतर होणार असून डिसेंबर २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पाचोरा रेल्वे प्रशासनाने दिली आहे.त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह सोयगाव तालुक्यात या अर्थसंकल्पात स्थान मिळाले आहे.

    कोठेही जा भाडे फक्त दहा रुपये

    या पी,जे रेल्वेच्या कोणत्याही स्थानकावरून कुठेही प्रवास करा भाडे फक्त दहाच रुपये आहे.त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारा हा पीजे रेल्वेचा प्रवास आहे.

    मजुरांचा झुकझुक गाडीने प्रवास

    सोयगाव परिसरातील सहा गावांचे शेती शिवार या पीजे मार्गाच्या लागूनच आहे.त्यामुळे मजुरांना शेतात कामाला जाण्यासाठी चक्क जुन्या काळापासून रेल्वेचा प्रवास भाग्यात आहे.या झुकझुक गाडीने मजूर वर्ग मोठ्या प्रमाणावर पहाटे आणि सायंकाळी घरी परत येण्यासाठी या पीजे रेल्वेने प्रवास करतात त्यामुळे सोयगाव परिसरातील शेतमजुरांना शेतात जाण्यासाठी रेल्वेचा प्रवास नशिबात आहे.

    दुपारची न्याहारी करण्याची शिटी

    पाचोरा ते जामनेर प्रवास करतांना ही पीजे रेल्वे सोयगाव तालुक्यातील माळेगाव,पिंपरी,कंकराळा आदी शिवारातून जात असल्याने दुपारी जामनेर वरून परत येतांना मजुरांना दुपारची न्याहारी करण्याची शिटी वाजवीत मार्गस्थ होत असते त्यामुळे या रेल्वेची शिटी वाजताच मजूर दुपारची न्याहारी करतात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.