पहुर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहुर कसबे सोसायटीचा मनमानी कारभार सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. जामनेर तालुक्यातील पहूर कसबे सोसायटी मध्ये गावातील नागरिक अनेक कामांसाठी पहुर कसबे सोसायटी येथे कामानिमित्त येत असतात मात्र आज सकाळी साडेदहा वाजले तरीही पहुर कसबे सोसायटी बंद होती त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना आल्या पायी परतावे लागत आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहेत.
पहुर कसबे व पहुर पेठ सोसायटीत एकच सेक्रेटरी काम पाहत आहेत त्यामुळे पहुर कसबे सोसायटी मध्ये नविन सेक्रेटरी यांची नियुक्ती करा अशी मागणी केली जात आहेत.
कर्मचारी गेले कोठे ? – पहुर कसबे सोसायटी रोज सकाळी आठ वाजता उघडते मात्र आज साडेदहा वाजले तरीही सोसायटी बंद असल्याने कर्मचारी गेले कोठे ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहेत तर पहुर कसबे सोसायटीचा मनमानी कारभार सुरू असल्याचे बोलल्या जात आहे.