पहुर ता. जामनेर
पहूर कसबे गावात ठेकेदाराकडून बोगस कामे सुरू असल्याची जोरदार चर्चा पहुर परिसरात सुरू असून या कामांविषयी सत्ताधारी, विरोधी व अधिकारी गप्प का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
पहूर कसबे गावातील वार्ड क्रमांक दोन मध्ये राजाराम बनकर यांच्या घरा जवळील गटारी वर नुकताच ढापा टाकण्यात आला होता तो ढापा पंधरा दिवसातच एका बाजूने तुटला व एका बाजूने चक्क आसाऱ्या दिसू लागल्या होत्या त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता पहूर येथील काही नागरिक पहूर येथील कामांची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव व गटविकास अधिकारी जामनेर यांच्याकडे करणार असल्याची चर्चा सुरू होताच या ढाप्याला आजूबाजूने व वरतून सिमेंट चोपडण्यात आले त्यामुळे हा ढापा किती दिवस टिकेल ? याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहेत.
तसेच राजाराम बनकर ते श्रीकृष्ण राऊत यांच्या प्लाट पर्यंत झालेल्या रस्त्याचे काम बोगस झाल्याचे बोलले जात असून रस्त्याच्या कामाची चौकशी झाल्याशिवाय ठेकेदाराला बिल देऊ नये अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
राम मंदिराजवळील पेवर ब्लॉक काढले
पहूर कसबे गावातील वार्ड क्रमांक तीन मधील राम मंदिराजवळ पेवर ब्लॉक बसविण्यात आले होते मात्र ते पेवर ब्लॉक बोगस असल्याने येथील नागरिकांनी बोगस कामे करू नका अशी भूमिका घेतल्याने येथील बसवलेले बोगस पेवर ब्लॉक ठेकेदाराने काढून घेतले याची जोरदार चर्चा पहुर परिसरात सुरु आहेत पहूर कसबे गावातील प्रत्येक काम नियमाप्रमाणे झाले आहेत का ?याची चौकशी झाल्याशिवाय कसबे ग्रामपंचायतीने ठेकेदाराला पैसे देऊ नये अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.