जामनेर- प्रतिनिधी
तालुक्यातील पहुर येथील पोलिस ठाण्याचे कर्मचारी रात्रीच्या गस्तीवर असतांना त्यांनी संशयास्पद फिरणाऱ्या दोघांना चोरी केलेल्या मुद्दे मालासह अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पो.हे.काँ.विनय सानप,पो.नाईक ज्ञानेश्वर ढाकरे, पो.नाईक हंसराज वाघ हे काल दि.१६रोजी रात्री गस्तीवर असतांंना दि.१७रोजी पहाटे ५वाजेच्या सुमारास मोटार सायकल क्रमांक एम.एच.२१जे.०४७१ स्वार अजमत शहा कादरशहा फकीर(वय२०) व अक्रमशहा महमंद शहा फकीर(वय१८)दोन्ही रा.बिस्मिल्ला नगर जामनेर हे संशयास्पद आढळून आले.गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना थांबवले असता त्यांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना सोनळे फाटा येथे अधांराचा फायदा घेऊन झाडाखाली लपून बसले होते.त्यांना ताब्यात घेत पहुर पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून मोटारसायकल सह मंदिरातील पितळाची घंटा, समई,दिवा,दोन कलश असा१२हजार५००रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. हा ऐवज त्यांनी अजिंठा परिसरात चोरी करुन मिळवल्याची त्यांनी माहिती दिली. याप्रकरणी पहुर पोलिस ठाण्यात पो.नाईक ज्ञानेश्वर ढाकरे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.