पवारांची चाणक्य नीती आणि उद्धव ठाकरे मैदानातील हिरो 

0
22
मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख

मतांच्या जुळवाजुळवीनंतर  ‘वजाबाकी’ होणार नाही, याची दक्षता घेत, महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांनी शुक्रवारी राज्यसभेसाठी मतदान केले. विशेष म्हणजे
रणनीतीप्रमाणे वेळेत आणि चुका टाळून मतदानाला साऱ्याच पक्षांचे प्राधान्य राहिले. आघाडीच्या दोघा मतदारांनी मतपत्रिका दाखविण्याऐवजी इतर नेत्यांच्या  हातात दिल्याने भाजपने त्यावर आक्षेप घेतला. तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे दोन मतपत्रिका आल्याकडेही भाजप नेत्यांनी लक्ष वेधले. तर भाजपच्या एका मतदानावरही काँग्रेसने बोट ठेवले. आजारी असतानाही भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या रुग्णवाहिकेतून येत मतदानाचा हक्क बजाविला. दरम्यान, या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय आणि अपक्ष २८५ आमदारांनी मतदान केले. छोट्या पक्षांनी मतदान करेपर्यंत प्रमुख पक्षांजी धाकधूक वाढवली होती. परंतु, ज्या-त्या पक्षांना दिलेल्या शब्दाप्रमाणे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांनी मतदानाला हजेरी लावली. विधानभवनात सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरवात झाली. नियोजनप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेते विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख नेते सकाळीच आठ-साडेआठ वाजल्यापासूनच विधानभवनात आले होते. त्यानंतर भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे बहुतांशी आमदार बसमधून मतदानासाठी आले. शिवसेनेचे सर्वच आमदार बसमधून एकत्रित आले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य नेते आले. ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून पावणेअकारनंतर शिवसेनेच्या आमदारांनी मतदान केले. विधानभवनात येण्याआधी आणि आल्यानंतरही सर्वच पक्षाच्या आमदारांना थेट विधानभवनात नेण्यात येत होते. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी हेही वॉकरच्या सहाय्याने विधानभवनात आल्याचे पाहायला मिळाले. आपल्या आमदारांना वेळेत आणून मतदान करण्यात सर्वपक्षीयांची रणनीती यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, राजकीय चर्चांत शेवटच्या आपल्या   भूमिकेत ‘सस्पेन्स’ ठेवलेल्या बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनी दुपारी दोन-सव्वादोन वाजता विधान भवनात येऊन मतदान केले. पवार, पाटील यांच्यासह  काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि काही नेत्यांनी शेवटच्या टप्प्यात मतदान केले. मतदानानंतर बहुतांशी आमदारांनी मुंबई सोडली.

आजारी असूनही कार्डियाक ॲम्ब्युलन्समधून पुणे-मुंबई असा तीन-सव्वातीन तासांचा प्रवास करून ,मतदानासाठी आलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांचे दारातच फडणवीस यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी स्वागत केले. टाळ्या वाजवून भाजप आमदारांनी जगताप यांना ‘सॅल्यूट’ केला. ॲम्ब्युलन्समधून उतरविल्यानंतर जगताप यांना व्हिलचेअरवरून थेट मतदानाच्या ठिकाणी नेण्यात आले. जगताप हे दुपारी सव्वाबारा वाजता विधानभवनात आले होते. त्याआधी सकाळी सव्वा दहा वाजता मुक्ता टिळक याही ॲम्ब्युलन्समधून आल्या होत्या. जगताप आणि टिळक हे आजारी असल्याने सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमधील संघर्षात प्रत्येक मताला महत्त्व आल्याने जगताप आणि टिळक यांना बोलविण्यात आले होते.

या निवडनुक मतदान करून मतपत्रिका पक्षाच्या प्रतोदांना दाखविणे अपेक्षित आहे. मात्र, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हातात दिल्याकडे भाजपच्या पराग आळवणी यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर भाजपच्या इतर नेत्यांनीही आक्षेप घेऊन या दोघांची मते बाद करण्याची मागणी केली. ती स्थानिक अधिकाऱ्यांनी नाकारली. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बोट दाखवून मतदानापासून लांब राहण्याचा पवित्रा घेतल्याची चर्चा असलेले खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांनी दुपारी मतदान केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहिते यांच्याशी चर्चा करून मतदानासाठी बोलाविल्याचे सांगण्यात आले. आणि त्यांची नाराजी दूर करत नार्वेकरांनी त्यांना फोन केला आणि मोहिते हे मतदानाला हजार झाले .तेव्हाच पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेही नाराजीतून मतदानासाठी येणार नसल्याची चर्चा पसरली. त्यामुळे बनसोडे यांच्याबाबतचे गूढ वाढले असतानाच बनसोडे यांनी मतदानाचा हक्का बजाविला. आजारी असल्याने उशिराने मतदानासाठी आल्याचे बनसोडे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजप ने राज्यसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले होते ,मात्र उद्धव ठाकरे यांनी सूत्र हातात घेत भाजपला एक लढवय्या सेनापती म्हणून रोखून धरले ,प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालून मतांची जुळवा जुळव करत थेट मैदानात उतरून राजकारण करण्याची ही पाहिली वेळ असावी, मात्र त्यात विरोधकांना चारी खाणे चित करत उद्धव ठाकरे यांनी पक्का खिलाडी असल्याचे सिद्ध केले आहे . त्यामुळे उद्धव ठाकरे याना राजकारण येत नाही असं म्हणून आता भाजपला चालणार नाही .ज्या प्रमाणे पवारांनी  राज्यात  सत्ता खेचून आणली तशीच ही निवडणूक उद्धव ठाकरेंनी यशस्वी करून दाखवली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here