पती रागावला पत्नीने घेतला गळफास

0
14

भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील दीपनगर येथील वसाहतीत एका २९ वर्षीय विवाहितेने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शरण्या पिल्लई (वय २९, रा.केरळ, ह.मु. दीपनगर वसाहत) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, दीपनगर वसाहतीतील रहिवासी व औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील मेसमध्ये कामाला असलेल्या मनाेज पिल्लयांच्या त्या पत्नी आहेत. संतापाच्या भरात आत्महत्येची ही घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. शरण्या पिल्लई ही आपल्या चार वर्षांच्या मुलास रागावली, म्हणून पती मनाेज हे पत्नीवर रागावले. त्याचा राग आल्याने महिलेने राहत्या घरात बेडसीट पंख्याला बांधून गळफास घेतला. यावेळी पती दुसऱ्या रूममध्ये होता. पत्नी दार उघडत नसल्याने त्याने आजूबाजूच्या लाेकांना बाेलावून दरवाजा ताेडला असता पत्नी शरण्या हीने गळफास घेतल्याचे समाेर आले. शरण्या हीने आत्महत्येपूर्वी तामिळ भाषेत चिठ्ठी लिहून ठेवली आहे. पती आणि मुलगा तुम्ही दोघांनी खुश रहावे, असा उल्लेख त्या चिठ्ठीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

माहिती मिळताच सहायक पाेलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे, सहायक फाैजदार शामकुमार माेरे, प्रेमचंद सपकाळे, अविनाश टहाकळे, सादीक शेख यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here