पतीकडून दगडाने ठेचुन पत्नीची निघृणपणे हत्त्या

0
27

चाळीसगाव : प्रतिनिधी
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने दगडाने ठेचून निघृणपणे हत्या केल्याची थरारक घटना चाळीसगाव शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्ग्या परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथील प्रकाश उर्फ भुरा सोनवणे हे आपल्या पत्नीच्या पोटात दुखत असल्याने चाळीसगाव शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्गा येथे शनिवारी आलेले होते. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सोनवणे याने मायाबाई प्रकाश उर्फ भुरा सोनवणे (वय- ४०) हीच दगडाने ठेचून निर्दयपणे खून केला. हि धक्कादायक घटना २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्गा परिसरात घडली.
याप्रकरणी गं.भा. भारतीबाई गायकवाड यांच्या फिर्यादीवरून प्रकाश उर्फ भुरा सोनवणे याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम-३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शहर पोलिसांनी आरोपी प्रकाश उर्फ भुरा सोनवणे याला ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि दिपक बिरारी हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here