न. ह. रांका महाविद्यालयाची पालक – शिक्षक संघ सहविचार सभा उत्साहात

0
32

साईमत बोदवड प्रतिनिधी

येथील रांका विद्यालयात मुख्याध्यापक प्राध्यापक पी.एम .पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालक शिक्षक संघाची सहविचार सभा नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी उपप्राचार्य एम. टी. नेमाडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष रामेश्वर कोळी, सहसचिव पारस जैन, विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा अध्यक्षीय सूचना प्राध्यापक जे. एन. राऊळ यांनी तर अनुमोदन श्री व्यवहारे यांनी दिले. पालक शिक्षक संघाचे विभाग प्रमुख प्राध्यापक जी. व्हि. चौधरी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. नेमाडे यांनी पालक शिक्षक सभेच्या उद्दिष्ट याबद्दल चर्चा केली.

शिक्षकीय मनोगतात प्राध्यापक के. एस. उबाळे यांनी वर्षभरातील शैक्षणिक उपक्रमाविषयी माहिती दिली तसेच शाळेच्या मागील उत्कृष्ट निकालाची परंपरा स्पष्ट केली उपाध्यक्ष रामेश्वर कोळी यांनी सीईटीचे क्लास शाळेमध्येच व्हावे असे आपल्या मनोगतात सांगितले.
अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक तथा पालक सभेचे अध्यक्ष प्राध्यापक पी. एम. पाटील यांनी आजच्या मोबाईलच्या युगामध्ये आपल्या पाल्याकडे वैयक्तिक लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच पाल्याच्या प्रगतीसाठी ध्येय ठरवणे त्यासाठीचे उपाययोजना करणे व ध्येयपूर्तीसाठी कठोर परिश्रम घेणे ही त्रिसूत्री यशाची गुरुकुल्ली आहे. असे सांगितले व कार्यक्रमाचे पालक सभेमध्ये CET/NEET/JEE चे क्लास योग्य मापक फी घेऊन सुरू करावे असे ठरले. तसेच संस्थेस देखभाल दुरुस्तीच्या संदर्भात येणाऱ्या आर्थिक अडचणी व अंशता विनाअनुदानित वर्गाच्या अडचणी लक्षात घेऊन प्रवेश घेताना योग्य ती रखरखाव फी द्यावी असे सर्वानुमंते ठरले. आभार प्राध्यापिका एम. एस.हडप यांनी मानले. सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here