वॉशिग्टंन : वृत्तसंस्था I न्यूयॉर्कमध्ये एका बहुमजली रहिवाशी इमारतीला भीषण आग लागून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नऊ लहान मुलांचा समावेस असून डझनहून अधिक जखमी झाले आहेत. रविवारी लागलेली ही आग अमेरिकेत रहिवाशी इमारतीत लागलेली आतापर्यंतची सर्वात भीषण आग असल्याचं तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. एका हिटरमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
“19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमच्याकडे आली असून अनेकजण गंभीर जखमी आहेत,” अशी माहिती मेयर एरिट ॲडम्स यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी 63 लोक जखमी झाल्याचे सांगितले. न्यूयॉर्क शहराचे अग्निशमन दल प्रमुख डॅनियल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “मार्शल्सनी गोळा केलेले पुरावे आणि रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार एका बेडरुममध्ये पोर्टेबल इलेक्ट्रिक हिटरला आग लागल्यानंतर ही आग पसरत गेली”.
19 मजल्याच्या या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावर ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवळपास 200 जवान घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी अनेक लोक इमारतींमध्ये अडकले होते. आपली सुटका करण्यासाठी दुसरा कोणता मार्ग नसल्याने खिडकीतून ते मदत मागत होते.