जळगाव : प्रतिनिधी
निसर्ग मित्र समितीतर्फे उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी सहज व थंड पाणी उपलब्ध या उद्देशाने परळ वाटपाचा कार्यक्रम काल पार पडला. या प्रसंगी निसर्ग मित्र समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, सचिव अक्षय सोनवणे, भाजयुमो सरचिटणीस महेश पाटील, चेतन मुथा, मदन खडे, रवी भोई, हे उपस्थित होते. नागरिकांना परळ वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी जितेंद्र बागरे, विकास
वाघ यांचे सहकार्य लाभले, असे पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.



