निराधारांना आधार देण्यासाठी शासन कटिबद्ध – ना.गुलाबराव पाटील

0
16

जळगाव ः प्रतिनिधी

घरातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूची पोकळी कुणी भरून काढू शकत नाही. मात्र या आपत्तीच्या काळातही निराधारांना आधार देण्यासाठी शासन कटिबद्ध असून आपण आयुष्यात नव्या उमेदीने वाटचाल करावी. आपल्यासोबत आम्ही आहोत, अशा भावना आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केल्या. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील 22 महिला व पुरुषांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत 4 लाख 40 हजाराचे मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले आहेत. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील बोलत होते.
दरम्यान, यातील पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचे लाभ देण्यात यावे असे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांना दिले. अजिंठा विश्रामगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 18 ते 59 वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 3 महिन्याच्या आत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी 20 हजारांचा अर्थसहाय्याचा धनादेश दिला जातो. या अंतर्गत जळगांव तालुक्यातील 22 व्यक्तींना प्रत्येकी 20 हजार या प्रमाणे एकूण 4 लाख 40 हजाराचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून त्याबाबतचे धनादेश पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगायोचे तालुकाध्यक्ष रमेशआप्पा पाटील, आभार नायब तहसीलदार राहूल वाघ यांनी मानले. प्रास्ताविकात तहसीलदार नामदेव पाटील यांनी योजनेची माहिती विशद केली. यावेळी प्रांताधिकारी महेश सुधळकर यांनी निराधार महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती सविस्तरपणे विषद केली.
या प्रसंगी संगायोचे तालुका अध्यक्ष रमेशआप्पा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, शिवसेनेचे उपजिल्हा संघटक नरेंद्र सोनवणे, प्रांताधिकारी महेश सुधळकर, तहसीलदार नामदेव पाटील, संगायोचे सदस्य चंदू भोळे , कारकून सुभाष तायडे आणि के.आर. तडवी आदींची उपस्थिती होती.
22 लाभार्थ्यांना लाभ
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत जळगाव तालुक्यातील पात्र लाभार्थी असे नशिराबाद येथील श्रीमती फरजाना बी शेख तकिम, तब्बुसुम बानी शे.अय्युब पिंजारी, दिपाली वारके, सुशीला भोई, दुर्गाबाई सपकाळे , दापोरा येथिल श्रीमती सुमन ठाकरे , जिजाबाई गायकवाड, मीराबाई ठाकरे, जळके येथिल श्रीमती मंगलाबाई चिमणकरे, मोहाडी येथिल श्रीमती संतरीबाई राठोड, मालुबाई सपकाळे , अलका वाघ ( चिंचोली), मीराबाई सपकाळे (धामणगाव ), सीताबाई भिल (आसोदा), माधुरी सोनवणे (भादली खु.), अरुणा भिल (भादली बु.), मंगलाबाई भिल (वसंतवाडी ), पूजा सोनवणे (पाथरी), सविता मिस्तरी (शिरसोली प्र.न.), छाया सोनवणे (खेडी ), आरती भोई (आमोदे खु.), प्रमिलाबाई पाथरे (देव्हारी) असे पात्र लाभार्थी असून यातील उपस्थितांना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here