सोयगाव : प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील निंबायती येथे आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या गोरगरीब महीला पुरूष व अपंग 30 तीस कुटुंबांना किराणा किट वाटप करण्यात आले.
यावेळी पुणे येथील के. एम. हॉस्पिटल सामाजिक संस्थेच्या बिराजदार मॅडम, महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अलीबाबा तडवी, औरंगाबाद जिल्हा कार्यध्यक्ष करीम तडवी, ग्रामीण विकास सामाजिक संस्थेचे तालुका अधिकारी नागणे , तालुका कार्यध्यक्ष तथा ग्रा.पं. सदस्य अनुप तडवी, सामाजिक कार्यकर्ते जुबेर तडवी, मा. ग्राम पं. सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते नजीर तडवी, मेहमूद तडवी, वजीर तडवी आदी उपस्थित होते.