ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदूरीकर महाराजांचे 4 जून रोजी कीर्तन

0
13

जळगाव : प्रतिनिधी

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने जळगावातील पिंप्राळा येथील श्रीराम संस्थानच्या मैदानावर शनिवार दिनांक 4 मे रोजी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या मानराज पार्क नजीकच्या श्रीराम मंदिराच्या मैदानावर निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 ते रात्री 9 या कालावधीत आयोजीत करण्यात आलेल्या या किर्तनाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ह.भ.प. गौ- प्रेमी गजानन महाराज वरसाडेकर यांनी केले आहे.

अवचित हनुमान मंदिर परिसरात पालकमंत्र्यांची होणार बुंदी तुला
जळगाव/धरणगाव ः प्रतिनिधी
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदा भरगच्च समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून याच्या अनुषंगाने धरणगाव शहर व जळगाव तालुक्यातील विदगाव येथे आज 3 रोजी कार्यक्रम होत आहेत. त्यात धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात आमदार स्थानिक विकास निधीतून धरणगाव तालुक्यातील 70 दिव्यांग बांधवांना 5 लक्ष तरतुदीतून सहाय्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे तर जळगाव तालुक्यातील विदगाव येथे ना. गुलाबराव पाटील यांची बुंदी तुला करण्यात येत आहे.
दरम्यान, धरणगाव शहरातील प्रमुख चार चौकांच्या सुशोभीकरणाचे उदघाटन देखील ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येत आहे.
दरम्यान, यासोबत उद्या जळगाव तालुक्यातील विदगाव जवळच्या अवचित हनुमान मंदिर परिसरात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची तालुका शिवसेनेच्या वतीने बुंदी तुला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी सभापतींचे पती जनाआप्पा पाटील (कोळी), शिवसेना उपतालुका प्रमुख दिलीप जगताप आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी शिवसेनेचे विदगाव, रिधूर, नांद्रा, ममुराबाद, डिक्साई, घार्डी, आमोदे आदीसह परिसरातील गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संचालक, शिवसेना व युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here