जळगाव ः प्रतिनिधी
शेतकरी व कृषिउद्योजकांच्या पुढच्या पिढीला चालना देण्यासाठी फाली औद्योगिक जगतातील नायकांना एकत्रित आणत आहे. त्यासाठी जैन हिल्स येथे फाली आठव्या संम्मेलनाचा पहिले सत्र 1 व 2 जून ला यशस्वी पार पडले. या संम्मेलनाचे दुसरे सत्र 4 व 5 जूनला घेतले जात आहे. या दुसऱ्या सत्रामध्ये उर्वरित 400 विद्यार्थी सहभागी होत आहेत. या संम्मेलनासाठी महाराष्ट्र व गुजरात राज्यातील 135 शाळांमधील 11 हजार विद्यार्थ्यांमधून 800 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. फालीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 25 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले आहे.
जैन हिल्स येथे आयोजित ‘फाली`च्या आठव्या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात गुरुवारी पहिल्या सत्रात 67 शेती व्यवसाय योजना आणि 67 नावीन्यपूर्ण उपकरणांविषयी सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.नाविन्यपूर्ण शेती उपकरणांत सातारा तर व्यवसाय योजनांत नंदुरबार जिल्ह्यातील लोणखेडा येथील सातपुडा विद्यालय प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
आधुनिक शेती, कृषी व्यवसाय तसेच ग्रामीण विकास ह्या क्षेत्रात कार्यरत असलेले त्यासोबत उच्च शिक्षण घेणाऱ्या सहा फालीच्या माजी विद्यार्थ्यांची यासाठी खास उपस्थित असेल. फाली शाळांमधील संवादात्मक शिक्षण, प्रात्यक्षिके, क्षेत्रभेटी, वेबिनार, बिझनेस प्लॅन आणि इन्होवेशन स्पर्धा या सर्वांसाठी जबाबदार असलेले 70 हून अधिक ए. ई. (ॲग्रिकल्चर एज्युकेटर) जे बी.एस्सी आणि एम.एस्सी कृषि पदविधर आहेत. त्यांचीही याठिकाणी उपस्थिती असेल. फाली 9 व त्यानंतर फालीला ज्या कंपन्या पुरस्कृत करतील अशा कंपन्या आणि बँकांचे ज्येष्ठ व्यवस्थापक आणि 30 हून अधिक प्रतिनिधीसुद्धा यात उपस्थित राहतील.
सध्या जैन इरिगेशन, गोदरेज ॲग्रोव्हेट, यूपीएल, स्टार ॲग्री आणि ओम्निव्होर या कंपन्या फालीला पुरस्कृत करतात. जैन इरिगेशन फालीच्या आठव्या संम्मेलनाचे यजमान आहेत. भविष्यात फालीला प्रायोजित करू शकणाऱ्या कंपन्यांमध्ये टाटा रॅलीज, महिंद्रा, आइटीसी, अमूल आणि दीपक फर्टिलायझर यांचा समावेश आहे. फालीच्या संचालक मंडळात कार्यरत असलेल्या व्यक्तींमध्ये नादीर गोदरेज (अध्यक्ष फाली व गोदरेज ग्रुप), रजनिकांत श्रॉफ अध्यक्ष यूपीएल, अनिल जैन उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन, नॅन्सी बेरी – उपाध्यक्ष असोसिएशन फॉर फाली. फाली उपक्रमाचा विस्तार 25 टक्के प्रती वर्ष या वेगाने केला जाईल.
फाली संमेलनामध्ये 4 जून रोजी विद्यार्थी फळबागेच्या लागवड पद्धती, शिवारफेरी, टिश्यूकल्चर, सोलर पार्क, बायोपार्क, फळभाज्या प्रक्रिया उद्योग, आर ॲण्ड डी, सिंचन प्रकल्प, गांधीतिर्थ यासह जैन इरिगेशनचे कृषितंत्रज्ञान समजून घेतील. प्रगतीशील शेतकऱ्यांबरोबर जैन हिल्सवर सुसंंवाद साधतील. फाली विद्यार्थ्यांचे गट त्यांचे कृषि व्यवसाय योजना आणि इन्होवेशन मॉडल्स 5 जून रोजी सादर करतील. यातील विजेत्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येईल. यावेळी फाली उपक्रमाला पुरस्कृत करणाऱ्या कंपन्यांचे व्यवस्थापक आणि प्रतिनिधी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधतील. या संम्मेलनाच्या समारोपाला अर्थात 5 जून ला जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, गोदरेज ॲग्रोव्हेटचे बुर्जीज नादीर गोदरेज या मान्यवरांचे मुख्य भाषण होईल. या संमेलनासाठी महाराष्ट्र व गुजरात राज्यातील 135 शाळांमधील 11 हजार विद्यार्थ्यांमधून 800 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.
प्रगतीशील शेतकऱ्यांशी
साधणार सुसंवाद
फाली संमेलनात 4 जून रोजी विद्यार्थी फळबागेच्या लागवड पद्धती, शिवारफेरी, टिश्यूकल्चर, सोलर पार्क, बायोपार्क, फळभाज्या प्रक्रिया उद्योग, आर ॲण्ड डी, सिंचन प्रकल्प, गांधीतिर्थसह जैन इरिगेशनचे कृषितंत्रज्ञान समजून घेतील. प्रगतीशील शेतकऱ्यांबरोबर जैन हिल्सवर सुसंंवाद साधतील. फाली विद्यार्थ्यांचे गट त्यांचे कृषि व्यवसाय योजना आणि इन्होवेशन मॉडल्स 5 जून रोजी सादर करतील. संमेलनाच्या समारोपाला अर्थात 5 जून ला जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, गोदरेज ॲग्रोव्हेटचे बुर्जीज
नादीर गोदरेज यांचे मुख्य भाषण होईल.
3
=======