नायगाव येथे पंतप्रधान आवास योजनेत पात्र लाभार्थ्यांना डावलवुन अपात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुर

0
23

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायती अंतर्गत गावासाठी मंजुर करण्यात आलेली पंतप्रधान आवास योजना ( ड यादी ) ही चुकीच्या निकषावर करण्यात आलेली असुन , खरे लाभार्थ्यांना या यादीतुन वगळण्यात आले असुन त्यांचा तात्काळ पंतप्रधान आवास योजनेच्या यादी समावेश करण्यात यावा अशी मागणीचे निवेदन असंख्य ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना देण्यात आले आहे.

या संदर्भात यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना देण्यात आलेल्या लिखित तक्रार निवेदनात नायगाव ग्रामस्थांनी म्हटले आहे की , नायगाव ग्राम पंचामतच्या वतीने दिनांक १ मे२०१६ रोजी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा या साठी गावातील लाभार्थ्यांचा सर्वे करून एकुण ४३६घरकुलच्या पात्र लाभार्थ्यांची यादी मंजुर करण्यात आली होती .परन्तु दिनांक २८ जानेवारीच्या झालेल्या ग्रामसभेत एकुण २०२ घरकुल मंजुर करण्यात आले असल्याची माहीती समोर आली असुन , यातील २३४ पात्र लाभार्थ्यांची नांवे मात्र प्रतिक्षा यादी ठेवण्यात आल्याने गावात ग्रामस्थांमध्ये प्रचंड असे नाराजीचे वातावरण पसरले आहे . या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की , सदरची मंजुर झालेली घरकुलांच्या यादीत जे खरे व पात्र व लाभार्थी आहेत त्यांची कच्ची , कुळाची घरे , झोपडी अशी घरे आहेत त्यांच्या घरांना सर्वेक्षणात घरकुल पक्की टु रूम किचन अशी पक्की घरे असल्याचे दर्शविण्यात आली असुन , ज्यांची पक्की घरे आहेत अशांना लाभार्थी दाखण्यात आली असुन , त्यांची घरकुल मंजुर मंजुर करण्यात आली आहे . पंतप्रधान आवास योजने अंतर्गत खरे लाभार्थ्याना डावण्यात आले असल्याने गरजु लाभार्थ्यांवर हा अन्याय होत असल्याने तात्काळ २३४ पात्र व खरे विधवा , अपंग आणी बेघर तसेच कच्ची घरे असलेल्या लाभार्थ्यांंचे नांव समाविष्ठ करण्यात यावे व वशिलेबाजीने मंजुर करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्यांंची तात्काळ चौकशी करण्यात यावी व गावातील पात्र घरकुल लाभार्थ्यांवरील झालेला अन्याय दुर करावा तसे न झाल्यास सर्व ग्रामस्थ आपल्या पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा ईशारा देण्यात आला असुन , यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना देण्यात आलेल्या निवेदनावर मुस्तफा हैदर तडवी , विनोद बाबु तडवी , लुकमान महारू तडवी , सुभान इमाम तडवी , छबु खुदयारखा तडवी, फकीरा सुभान तडवी, सिकंदर ईमाम तडवी, राबीया राजु तडवी, हमीद ईकबाल तडवी , रशीद निजाम तडवी , फिरोज कलींदर तडवी , निजाम बक्षु तडवी आदीच्या स्वाक्षरी आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here