नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक यांना कामावरून कमी करण्याचे आदेश

0
22

बोदवड : प्रतिनिधी

तालुक्यातील नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक गौतम बाबुराव निकम यांना रोजगार सेवक या पदावरून कमी करण्याचे आदेश दि.२० रोजी प्रभारी गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे बोदवड यांनी नांदगाव येथील ग्रामसेवक व सरपंच यांना दिले आहे.
निमखेड शिवारातील गट क्रमांक १६३ मध्ये बाबुराव लक्ष्मण निकम व नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक गौतम बाबुराव निकम यांनी एकाच शेतात दोन विहिरीचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान घेतले होते,परंतु एकाच विहिरीचे खोदकाम व बांधकाम केले होते, दुसऱ्या विहिरीचे अंदाजित अनुदान १ लाख ३४ लाटून भ्रष्टाचार केला होता,माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन रामा आसने यांनी तक्रार दाखल केली होती,वारंवार तक्रार व स्मरणपत्र, दोन वेळा उपोषण करण्यात आले होते, महासंघाच्या वतीने तक्रारदार आसने यांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे यश प्राप्त झाले आहे, तसेच पंचायत समिती या स्थानिक प्रशासन ग्राम रोजगार सेवक गौतम बाबुराव निकम यांनी ग्राम रोजगार सेवक या पदावरून कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रतिक्रिया
वारंवार तक्रार व स्मरणपत्र देऊन सुद्धा संबंधित अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे आम्ही माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद समोर उपोषणाचा इशारा दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, यापुढे सुद्धा कोणीही अश्याप्रकारे शासकीय निधीचा दुरुपयोग निधी हडप करण्याचा प्रयत्न केला तर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने तक्रारी दाखल करण्यात येतील असे महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन आसने यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here