जळगाव ः प्रतिनिधी
तालुक्यातील नशिराबाद गावातील 200 बांधकाम मजुरांना बांधकाम कामगार विभागासह शिवसेनेच्या कामगार सेना व झिअम फाउंडेशन अध्यक्ष प्रदीप साळी यांच्या प्रयत्नातून सुरक्षारक्षक किट असलेल्या पेट्यांचे वाटप करण्यात आले. भवानीनगर येथे हा कार्यक्रम पार पडला.
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप साळी, माजी सरपंच पंकज महाजन, विकास पाटील, विनोद रंधे, गणेश चव्हाण, सय्यद बरकत अली, विनायक धर्माधिकारी, बंडू रत्नपारखी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.