Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»नगरदेवळा येथे ना.अब्दुल सत्तार यांचा नागरी सत्कार
    पाचोरा

    नगरदेवळा येथे ना.अब्दुल सत्तार यांचा नागरी सत्कार

    saimat teamBy saimat teamFebruary 4, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा ः प्रतिनिधी

    तालुक्यातील नगरदेवळा येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुलजी सत्तार यांचा शिवसेना पदाधिकारी व मुस्लिम समाजातर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी आ.किशोर पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

     

    ढोल-ताशांच्या गजरात आलेल्या मान्यवरांचे स्वागत करीत मिरवणूक कालिंका माता मंदिराजवळून मार्केट यार्डमध्ये आली. यावेळी हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यांच्या समवेत आ. किशोर पाटील, शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, जि.प.सदस्य पदमसिंग राजपूत, राजू राठोड, संपर्क प्रमुख सुनील पाटील, किशोर बारावकर, शरद पाटील, अविनाश कुडे, शिवनारायण जाधव, सुधाकर महाजन, अ.गणी शेख कमरुद्दीन उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी केले. त्यांनी गावाची भौगोलिक परिस्थिती सांगत नदीपात्राच्या खोलीकरणाचा व सौरक्षण भिंतीचा मुख्य विषय मान्यवरांच्या समोर मांडला व आ. किशोर पाटील व त्यांच्या जिल्हापरिषद निधीतून केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची महिती दिली.

    आ.किशोर पाटील यांनी सांगितले की, असंख्य मुस्लिम कार्यकर्ते यांचा प्रवेश सोहळा बघून मी भारावून गेलो. मुस्लिम लोक दिलेला शब्द पाळतात, याचा मला अनुभव आहे. त्यांनी ग्रा.पं.ला आपल्यासोबत दिलेले तिघेही उमेदवार निवडून आणले आणि मीदेखील त्यांच्याच मदतीने आमदार म्हणून निवडून आलो. आजपर्यंत त्या प्रभागांमध्ये आपले सदस्य नसल्याने त्या वार्डाचा विकास खुंटला. पण, आपण माझ्यावर विश्‍वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला त्याची परतफेड विकासकामे करून करेल, असे उद्गार काढले.

    सत्काराला उत्तर देताना ना.अब्दुल सत्तार म्हणाले की, शिवसेना हा हिंदूवादी पक्ष असून त्यांचा झेंडाही भगवा आहे. त्यांना हिंदुत्वाची पदवी देण्याची कुणाला गरज नाही. परंतु शिवसेना दिलेल्या शब्दाला जागणारा पक्ष आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मी इथे या पदावर उभा आहे.

    यावेळी त्यांनी सर्व निवडून आलेल्या सदस्यांचा व प्रवेश केलेल्या सदस्यांचा सत्कार केला. तसेच हिंदू-मुस्लिम समाजातील प्रवेश केलेल्यांचे अभिनंदन करीत आलेल्या निवेदनातील मुख्य म्हणजे शादी हॉल, नदीपात्र खोलीकरण, कब्रस्थानचे रस्ते व सुशोभिकरण यासाठी मोठा निधी देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

    यावेळी ग्रा.पं.सदस्य नूरबेग सुपडूबेग मिर्झा, बापू चौधरी, वसीम शेख, भाजपा शहराध्यक्ष सुनील महाजन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

    यावेळी कृष्णा सोनार, हबीब शेठ, जगन सोनी, सादीक बागवान, कन्हैया परदेशी, रऊफ, अयुब मास्टर, राजेश जाधव, सागर पाटील, विनोद परदेशी, गोरख महाजन, अरविंद परदेशी, भैया महाजन, सोनू परदेशी, अन्सार बेग, विनोद राऊळ, मोसीन शेख, रवींद्र पाटील, अन्वर शेख, अयास बेग, अजय बागूल, अमेश मोरे, भारत भामरे, दत्तू भोई, राकेश शिरुडे, उमेश लढे, निजाम खाटीक, कडू पाटील, धर्मराज पाटील, पियुष राजपूत, किरण पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नाना वाघ यांनी केले तर आभार विधानसभा क्षेत्रप्रमुख अविनाश कुडे यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.