धृतराष्ट्र नाही छत्रपतींचा महाराष्ट्र

0
14

मुंबई -यास्मिन शेख 
राज्याचे अर्थ सकल्पलीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तवा चर्चेवर उत्तर देत असताना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाच्या आरोपांचा समाचार घेतला.  उभेराहून बोलले तर जोर येतो , बसून बोललो तर जोर राहणार नाही असे समजू नये असत सांगत त्यांनी एक छुपा संदेश  समीरच्याया बाकवरील नेत्याना दिला .  यावेळी त्यांनी चर्चेत सहभागी झालेल्या सर्व आमदारांचे आभार मानले तसेच त्यांनी केलेल्या सूचनांचे नोंद घेतल्याचे ही संगितले .  महाराष्ट्रराज्याची संस्कृती , प्रथा , परमपर आहे अभिभाषणाच्या वेळी झालेले गोधळ शोभणीय नाही . दाऊद चा उल्लेख हा गेली आठवडे भर विरोधी पक्षनेते यांनी सुरू ठेवले ,  तेच तेच के आपण दाऊद च्या मागे फरफटत चाललो आहोत . असं बोलून त्यांनी विरोधी पक्षाला कानपिचक्या दिल्या . मुख्यमंत्री यांनी यावेळी राज्यपाल अभिभाषणात राहिलेल्या मुद्द्यांवर बोलत सरकारने कोरोना काळात केलेलं काम पटलावर आणले .पर्यावरणाचा उल्लेख करत राज्य ला पुरस्कार मिळल्याने राज्यपालांना राज्याचाअभिमान  वाटत असल्याचे त्यांनी यावेळी विशेष नमूद केले .

मुख्यमंत्री यांनी केलेले भाषण म्हणजे विरुद्ध पक्षाला आरश्यात पाहिले की भ्रष्टाचार दिसते असं म्हणत भाजपच्या नेत्याना चिमटा काढला . आपला तो चांगला दुसऱ्याचा तो. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधीर मुंगूनटीवार यांचा  आरोपांचा समाचार घेत देशातील  भाजप शासित अन्य राज्यातील दारू दुकाने  आणि दारू विक्रीचे प्रमाण मुख्यमंत्री  यांनी सभागृहात वाचून दाखवले , मुंबई आणि मुंबईच्या विकासाचे पेटंट जगभरात प्रसिद्ध झाले , मुंबईतील महानगर पालिकेच्या शाळा मधील शिजशांचा दर्जा उल्लेखनीय आहे . देशातील सर्वात चांगली महानगर पालिका म्हणून मुंबई महानगरपालिका कडे पाहिले जाते .मात्र राज्याला बदनाम करण्याचे काम विरोधकांकडून सातत्याने होत आहे . हा अन्याय आहे असे ही मुख्यमंत्र्यांनी  सांगत विरोधी पक्षाला द्वेषाची कावीळ झाली आहे त्याचा विलाज कसा करणार असे त्यांनी संगितले . कोरोना काळात नदीत मृतदेह फेकन्याची वेळ महाराष्ट्र सरकारवर आली नाही  असे सांगत उत्तर प्रदेश मधील कोरोना काळात जनतेचे हाल  झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले . जीव वाचवण्यासाठी कोरोना काळात मुंबई महापालिकेचे काम महत्वाचे मात्र तरी त्यांच्या चौकशी केली जाते हे  कसे होतंय . असे सांगत त्यांनी एक प्रशासक म्हणून प्रशासनाची पाठ रखान केली . धारावी मधील करूनच शिरकाव हा सर्वांसाठीच नाही तर देशासाठी चिंतेची बाब होती मात्र मुंबई महानगरपालिका कर्मचारी आणि नियोजनाने धरावी वाचवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या किंवा धारावीतील जनतेचा जीव वाचणाऱ्यांवर कौतुकाची थाप न देता भ्रष्टाचाराचे आरोप करून ‘पाप करू नका .

ते पुढे म्हणाले की , टीका आणि बदनामीला मी घाबरत नाही . नवाब मलिक यांचा राजीनामा मागता आहेत ते कसे …. केंद्रातील गुप्त यंत्रणा याना अद्याप हे कळले नाही जे तुम्हाला कळाले म्हणजे काय? केंद्रातील गुप्तचर यंत्रणा इतक्या कमजोर झाल्या का? दाऊद चा हस्तक 4/5 वेळा निवडून येतो किंबहुना देशात राज्यात बिनधास्त फिरतो  आणि आपल्या केंद्रांच्या एजन्सीला ते कळत नाही ?  हे विशेष  राहिला विषय इडी चा सोयी नुसार  सर्व माहिती त्यांना मिळते कशी “इडी आहे की घरगडी” ? हेच कळत  नाही . म्हेबूब मुफ्ती  चे विचार भाजपला  माहिती नव्हते का ? मग या म्हेबूबा मुफ्ती यांच्या बरोबर सत्ता मांडली कशी ? यालाच म्हणता आपलं ठेवायचं झाकून , आणि दुसऱ्याच हे काय ????

यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषांचा मोर्चा हा भावनिक आणि  इडी ची कारवाही कडे वळवला , शिवसेनेच्या नेते आमदार तसेच कुटुंबाची बदनामी हे नीच आणि विकृती आहे . असे त्यांनी यावेळी ठणकावले.  सत्ते साठी हे होत असून,  हर्षवर्धन पाटील यांना इकडे असताना झोप लागत नव्हती मात्र भाजपात गेले आणि आता त्यांना शांत झोप लागते हे कसे ?  भाजप ने हेयूमन लॉड्री सुरू केली आहे का ?  आपल्या मुलांचे धृत उद्योग दिसत नव्हते असा हा धृतराष्ट्र नाही, हा  छत्रपतींचा महाराष्ट्र , आहे .

असे म्हणत मुख्यमंत्री भावनिक झाले. दोन दिवसांपूर्वी  इडी ने  मुख्यमंत्री यांचे मेहुणे पाटणकर यांच्यावर छापे टाकले आहेत त्यावरून भाजप नेत्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या पारिवारिक , आर्थिक,  व्यवहारिक सबंधाना जाणते समोर आणत ते सर्व काही भ्रष्टाचार असल्याचे चित्र उभे केले . या आरोपांवर उत्तर देताना मुख्यमंत्री भावुक झाले त्यांनी सभागृहत सांगितले की ,

तुम्हाला सत्ता हवी आहे.  मी येतो  तुमच्या बरोबर मात्र सत्ते साठी नाही तर मला तुरुंगात टाका . मी कृष्ण नाही मी हे संगतो आहे मात्र तुम्हाला सांगता यावं की तुम्ही कन्स नाहीत. मला नेहमी संगितले जाते की बाळासाहेबां ना के उत्तर देतील मात्र मी 2014 मध्ये ही हिंदू होतो आज ही आहे  , बाळासाहेबांनी ज्यांना बाबरी मध्ये वाचवले ते आज वरती गेलीत ते काय सांगतील ? बाळासाहेबांना याचा विचार करा . 1993 साली मार खाऊन ज्यांनी मुंबई सांभाळली त्यांना आज तुम्ही आरोप करत आहात . तुम्ही सांगितले ते सर्वच जेल मध्ये गेले सर्वांना जेल मध्ये पाठवा. मी तयार आहे मला जेल मध्ये पाठवा मात्र कुटुंबाची बदनामी थांबवा. ज्या प्रमाणे रामजन्मभूमी जमिनीत असल्याचे तुम्हाला कळले तश्या खोल जेल मध्ये मला ठेवा.’ तेथून मी कृष्ण जन्म होण्याची वाट पाहिलं . मुख्यमंत्र्यांनी  केलेल्या या भावनिक भाषनामुळे  संपूर्ण सभागृह स्तबद्ध झाले होते . उद्धव ठाकरेंनी केलेय या भाषांत भावनिक वेदना होत्या हे स्पष्ट होत असले तरी त्यांनी केलेल्या  भाषणातून  भाजप चा जनतेचे कैवारी असल्याचा बुरखा  यावेळी फाडला गेला किंबहुना हे सर्व काही भाजप सत्ते साठी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here