धुळे -प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या सकल्पनेतून संपुर्ण भारतात गोर-गरीब, शेतमजूर, ज्यांना घर नाही अशा सर्वांना घर मिळावे ह्याच उद्देशाने संपुर्ण भारतात पंधानमंत्री आवास ग्रामीण योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात येतात. शासनाच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुक्यातील संपुर्ण तालुकाभर त्या-त्या ग्रामपंचायतींनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील ज्यांना घर नाही किंवा जांचे घर पडके आहे अशा सर्व लाभार्थ्यांचा सर्वे करुन ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांचा डाटा संबंधीत विभागाकडे पाठविण्यात आला होता. परंतू सदर पाठविलेल्या यादीला सदर विभागाने कात्री लावल्यामुळे तालुक्यातील अनेक वंचीत राहणार असल्याची माहिती जि.प. सदस्य राम भदाणे यांनी आज जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आयत्यावेळच्या विषयांत दिली व त्याबाबत ज्या लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे त्या सर्वच लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
आज दि.२४ जानेवारी २०२२ रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची ऑनलाईन बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीस विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी स्थायी समिती सदस्य राम भदाणे यांनी अनेक विषय समितीपुढे मांडले. त्यात आयत्या वेळी येणाऱ्या विषयांमध्ये त्यांनी तालुक्यातील घरकुलांबाबतचा विषय ऐरणीवर आणत म्हणाले की, तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने गावातील सर्वे करुन घरकुल लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन पद्धतीने शासनाकडे पाठविलेली होती. त्याप्रमाणे नुकतेच घरकुला लाभार्थ्याची यादी प्रसिद्ध झाली आहे. परंतू सदर यादीला सदर विभागाने कात्री लावल्याने अनेक गरजू वंचीत राहणार असल्याबाबतची माहिती यावेळी जि.प. सदस्य राम भदाणे यांनी दिली.
यावेळी पुढे बोलतांना राम भदाणे म्हणाले की, तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पाठविलेल्या लाभार्थ्यांची यादीस सदर विभागाने पुढील प्रमाणे कात्री लावली आहे. उदा.नगांव ग्रामपंचायतीने ३८५ लाभार्थ्यांसाठी घरकुल मागणीची यादी ऑनलाईन पाठविलेली होती. परंतू सद्या प्रसिद्ध झालेल्या यादीत फक्त ८५ घरकुल लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशीच परिस्थिती संपुर्ण तालुक्याची आहे. सदर यादीतील नांवे कोणत्या निकषाने वगळण्यात आली आहेत. याबाबतीत सदर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी व वंचीत लाभर्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत समिती सदस्य राम भदाणे यांनी केली आहे.