धामणगाव येथे पा.पु. योजनेचे व विविध विकास कामांचे भूमिपूजन ग्रामपंचायतींनी समन्वयाने गावांचा विकास साधावा – प्रतापराव पाटील

0
48

साईमत जळगाव प्रतिनिधी

धामणगाव व परिसरातील विकासासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करून ग्रामपंचतीनी समन्वयातून गावाचा विकास साधावा असे नम्र आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी धामणगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील हे होते.

धामणगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना – ३६ लक्ष, मूलभूत सुविधा अंतर्गत (२५१५) सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे – २० लक्ष, गावअंतर्गत काँकटीकरण करणे – १० लक्ष, हायस्कूल परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे – ३ लक्ष तर मनरेगा अंतर्गत चौकात व रस्त्यांवर पेव्हिंग ब्लॉक बसविणे – ३० लक्ष असे एकूण सुमारे १ कोटीच्या पा.पु. योजनेच्या व विविध विकास कामांचे भूमिपूजन युवा नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, माजी सभापती जनाअप्पा कोळी, अनिल सपकाळे, सरपंच गोकूळ सपकाळे, उपसरपंच रोहिदास पाटील सर, शिवाजी सोनवणे, प्रल्हाद पाटील, नितीन सपकाळे, मार्केटचे माजी संचालक वसंत भालेराव, तुरखेडा सरपंच नितीन सपकाळे, ग्रा.पं. सदस्य किरण सपकाळे, सुनिल सपकाळे, अमोल सोनवणे, प्रमोद सोनवणे, राजू सपकाळे, मनोज सपकाळे, भुरा सपकाळे यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सपकाळ यांनी केले तर आभार अनिल सपकाळ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here