Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»धानोरा ते पेरणापीठ महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या पदयात्रेस सुरुवात
    चोपडा

    धानोरा ते पेरणापीठ महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या पदयात्रेस सुरुवात

    SaimatBy SaimatMarch 19, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धानोरा ता. चोपडा : वार्ताहर
    धानोरा ते पेरणापीठ ( अहमदाबाद गुजरात ) त्यांची सुरुवात आज सकाळी धानोरा गावा पासुन झाली. दि १९मार्चे ते 0२ एप्रिल पर्यंत ही पदयात्रा आहे .परमात्याकडे स्वःत ह पायी चालत गेले पाहिजे ही श्रध्दां अंगी बाणून धानोरा सह इतर गावाहुन आलेल्या पदयात्रींनी व्यक्त केली. या पदयात्रेत सर्वसमाजातील लोक सहभागी होत असल्याने एकात्मतेचे दर्शन होत असते.परम पुज्य महामंडेलेश्वर १००८ श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज ( फैजपुर संस्थान) यांच्या मार्गदर्शनाखाली या पदयात्रेची सुरुवात सन २००९पासुन करण्यात आलेली आहे, सुरुवातीला यांनी ही पदयात्रा सुरत ते पेरणापीठ अशी पाच वर्ष सुरु केली होती. या पदयात्रेत पायी चालणे हे एक प्रकारचे तप मानले जाते. या पदयात्रेत श्रध्देने हे सर्व सतपंथी भक्त चालत जातात. निष्कलंकी नारायणाचा नाम घोष करतात, सत्ससंगाचा लाभ घेतात,व सतपंथी परंपरेचा, जीवनशैलीचा अंगीकार करुन सत्येचा प्रचार आणी प्रसार करतात, अशी प्रतिक्रिया धानोरा सतपंथ मंदिराचे गादीपती विजय मुखी  महाराज यांनी सायंदैनिक साईमतला दिली.
    या पदयात्रेत मुक्कामी ठिकाणापासुन अनेक जण जोडले जातात. आणी व्यापक स्वरुप होत जाते .पदयात्रेत दररोज सकाळ संध्याकाळ महाआरती , प्रभातीपुजा, इमाम शहा महाराजांचा सत्संग होत असतात. अनेक भाविक या पदयात्री ना स्नेहभोजन देत असतात . या पदयात्रेत फैजपुर, धानोरा, चोपडा, जांभोरा, शेंदुर्णी, शिरपुर, शहादा, तळोदा, कुकर मुंडा, डेडीयापाडा, राजपिपला येथील भाविक मिळतात.
    काय आहे पेरणापीठ –
    कलीयुग व अथर्व वेदाच्या ज्ञानावर भाष्य केले आहे असे सतपंथाचे प्रवर्तक इमामशाह महारांजाची समाधी आहे . त्यांनी अध्यात्म ज्ञानयोग वि६ेद्वारे सतपंथाचा प्रचार आणि प्रसार केला, त्यांचा जन्म काळ १२०४ते १३०२ असा आहे. मुळ मुलतान ( सध्याचे पश्चिम पाकीस्तान ) यांनी ६१ व्या वर्षी समाधी घेतली. त्यांना सुफी संत म्हणुन ओळखले जाते . त्यांनी त्या वेळेस सांगितलेली आगाम वाणीही ही सद्द स्थितीस खरी होत चालली आहे. गुढीपाडवा ( चैत्र शुद्ध ) या सणाच्या दिवशी हया पदयात्रेची पुर्णाहुती होत असते. या ठिकाणी सर्व सतपंथी एकत्र जमतात. तेथिल गादीपती ज्ञानेश्वर दासजी महाराज हे संबोधन करतात, त्यात उपासना मार्ग, कळस पुजा, ज्योत,वारी यज्ञ,सत पंथाच्या शंभर क्रियांचे ज्ञान देऊन माहीती दिली जाते . व्यसनमुक्ती, उपसना भक्ती, इमामशहा महाराजांचे संपुर्ण ज्ञान भजनातुन सांगितले जाते .
    या वर्षी जाणाऱ्या पदयात्रेची संख्या जास्त प्रमाणात आहे, जवळ जवळ १००च्यावर स्त्रीया, पुरुष, तरुण, तरूणी, अबालवृध्द या सर्वांचाच समावेश आहे. ही पदयात्रा १५ दिवसाची आहे.महामंडलेश्वर १००८ श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज, शास्त्री भक्ति किशोर जी महाराज सर्वसमन्वय मुखी महाराज फैजपुर संस्थानचे उपाध्याक्ष माणिकचंद महाजन, विजय मुखी,धनराज मुखी, मनोहरमुखी, आनंदामुखी, गजानन चौधरी, कैलास महाजन, कमलाकरमुखी, जयेश चौधरी,  तसेच सतपंथ ज्योत मंदिर धानोराचे अध्यक्ष बाजीराव पाटील, ध्वजधारक राजेन्द्र पाटील, सुभाष पाटील, सर्व धानोरा ग्रामस्थांचे आणी , फैजपुर संस्थानचे सर्व कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chop : घरगुती त्रासाचा फटका भावाने भावाचा दगडाने ठेचून खून केला

    March 22, 2026

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.