धरणगावात हाणामारी,‎ चौघांविरुद्ध गुन्हा दाखल‎

0
7

प्रतिनिधी । धरणगाव

‎ बेलदार मोहल्ला भागात किरकोळ‎ वादातून एकाला मारहाण‎ केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे.‎ आवेश खान नासिर खान (वय‎ २० रा. बेलदार मोहल्ला, धरणगाव)‎ यांनी फिर्याद दिली अाहे. ४ जून‎ रोजी ३.३० वाजता शकील खान‎ जमाल खान यांच्या घराजवळ त्याचे‎ घराचे अतिक्रमण काढणे चालू होते.‎ त्याठिकाणी यातील आवेश खान‎ उभे असल्याचा शकील खान‎ जमाल खान, रहेमखान जमाल‎ खान, अकीलाबी आसिफ खान,‎ जाफर खान जमाल खान या‎ संशयितांना राग आला. त्यांनी‎ आवेश खान व त्यांचे आई- वडील‎ यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी‎ व लाठ्या काठ्यांनी मारहाण केली.‎

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here