धनाजी नाना महाविद्यालयात योग व प्राणायाम कार्यशाळेचा समारोप

0
9

फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी
धनाजी नाना महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या व आय. क्यु. ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना महामारीच्या कालावधीत ‘योग व प्राणायामाचे महत्त्व’ या विषयावर एक सप्ताह चालणारी कार्यशाळेचा समारोप उत्साहात झाली.
समारोप समारंभास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी सर अध्यक्ष स्थानी व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिनेश पाटील, क्रीडा संचालक, कवयित्री बहिणाबाई चौधरी उतर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव हे उपस्थितीत होते. कार्यशाळेस महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. उदय जगताप, जिमखाना समितीचे चेअरमन प्रा. डॉ. सतिश चौधरी आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांची प्रमुख उपस्थिती होती. एक सप्ताह चालणार्‍या या ऑनलाईन कार्यशाळेस एकुण १७९ जणांनी नोंदणी केली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सतीश चौधरी, सुत्र संचालन डॉ. गोविंद मारतळे व आभार प्रा. शिवाजी मगर यांनी मानले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांनी कोरोना सारख्या महामारीत समाजातील व्यक्तीचे आरोग्य सुधारण्यासाठी रावेर- यावल तालुक्याचे आमदार तथा संस्थाध्यक्ष शिरीषदादा मधुकरराव चौधरी यांच्या प्रेरणेने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना डॉ. दिनेश पाटील यांनी त्यांचे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांचे अभिनंदन केले. धनाजी नाना महाविद्यालय हे नेहमीच आंतर महाविद्यालयीन, आंतर विभागीय स्पर्धा किंवा अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होणार्‍या संघाचे प्रशिक्षण कॅम्प घेऊन विद्यापीठाला सहकार्य करणारे महाविद्यालय आहे. अशाच पध्दतीने पुन्हा एकदा महाविद्यालय व क्रीडा विभाग आणि आय. क्यु. ए. सी. यांनी पुढाकार घेऊन एक चांगला उपक्रम राबविण्यात आला त्याबद्दल क्रीडा विभाग अभिनंदनास पात्र ठरला आहे. क्रीडा विभागाने खुपच छान पध्दतीने प्रात्यक्षिकांसह योग व प्राणायाम यांची संपुर्ण माहिती या कार्यशाळेतून समाजातील प्रत्येक घटका पर्यंत पोहचविण्याचे कार्य केले ही चांगली गोष्ट आहे. अशा स्वरूपाच्या विविध कार्यशाळेचे आयोजन केल्यास त्याचा फायदा समाजाला होइल व धनाजी नाना महाविद्यालय हे असे उपक्रम या पुढेही राबवेल असा विश्वास व्यक्त केला. धनाजी नाना महाविद्यालयाने राज्य, राष्ट्रीय आणि अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेत विविध खेळात पदक प्राप्त करून देत विद्यापिठाचे व महाविद्यालयाचे नाव लौकिक केले त्याबद्दल आम्हांला अभिमान आहे असे त्यांनी गौरवउद्गार काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. सतीश चौधरी यांनी कोरोना सारख्या महामारीत रोग प्रतिकार शक्तीचे महत्व आणि ती रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी योग व प्राणायाम यांची उपयोगिता या विषयी माहिती दिली. कार्यशाळेस महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांनी प्रशिक्षक म्हणून दिनांक १७ मे ते २२ मे २०२१ दरम्यान ऑनलाईन चाललेल्या कार्यशाळेस मार्गदर्शन केले. योग व प्राणायाम यांचे महत्त्व, योग व प्राणायाम करतांना श्वास प्रश्वास यांचे महत्त्व, कोणत्या व्यक्तीने कोणते आसन करू नये किंवा योग्य मार्गदर्शनाखाली करावेत या विषयी सखोल माहितीसह प्रात्यक्षिकांसह या कार्यशाळेच्या माध्यमातून डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेसंदर्भात गडचिरोली येथील प्रा. डॉ. राजु चावके आणि पश्चिम बंगाल येथुन कार्यशाळेस उपस्थित राहिलेल्या प्रा. वैशाली घाटे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here