Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»धक्कादायक ; शाळकरी विद्यार्थिनींचा विनयभंग
    अमळनेर

    धक्कादायक ; शाळकरी विद्यार्थिनींचा विनयभंग

    SaimatBy SaimatApril 19, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 
    शहरात राहणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विनयभंग करणाऱ्या संशयिताला अटक केली असून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील एका परिसरात १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी राहते. सोमवारी १८ एप्रिल रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी ही तिच्या इतर दोन मैत्रिणींसोबत घरी जायला पायी निघाल्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे संशयित आरोपी असलम खान पठाण रा. देवपुर, धुळे हा रिक्षा घेऊन विद्यार्थिनींच्या पाठलाग केला. तीनही विद्यार्थिनी पायी जात असताना संशयिताने रिक्षा थांबवली यातील एका विद्यार्थिनीचा हात पकडला. व सोबत चल असे सांगून तिचा विनयभंग केला. त्यावर विद्यार्थिनीने हात झटकून इतर मैत्रिणींसोबत पुढे पायी जायला निघाल्या. पुन्हा संशयित आरोपी असलम खान पठाण याने तीनही विद्यार्थिनींचा पुन्हा रिक्षाने पाठलाग करून त्यांचा रस्ता आडविला. यातील दुसऱ्या विद्यार्थिनीचा हात पकडून म्हणाला की, ‘ही नाही येत तर तू तरी चल, आपण दोघे फिरायला जावू’ असे सांगून तिचा देखील विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत तीनही विद्यार्थिनी घरी परत आल्यानंतर घडलेला प्रकार पालकांना सांगितला.
    पालकांनी तात्काळ अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी असलम खान पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरसिंह वाघ यांच्या पथकाने संशयित आरोपी असलम खान पठाण याला अटक केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026

    Jalgaon, Erandol Taluka:भातखेडा हादरला तरुणाचा धक्कादायक आत्महत्येचा प्रकार उघडकीस

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.