Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»धक्कादायक : मालेगावत चक्क मनगटापासून तोडला हात ; पूर्व वैमनस्यातून अघोरी हल्ला
    क्राईम

    धक्कादायक : मालेगावत चक्क मनगटापासून तोडला हात ; पूर्व वैमनस्यातून अघोरी हल्ला

    SaimatBy SaimatMarch 23, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मालेगावः नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये पूर्व वैमनस्यातून चक्क एका व्यक्तीचा हात तोडल्याचा प्रकार उघड झाला असून, जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. संशयित फरार झाला असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत. मात्र, या अघोरी हल्ल्याने पोलिसही चक्रावून गेलेत. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारींमुळे मालेगाव सतत चर्चेत आहे. दिवाळीच्या सुमारास तर मालेगावमध्ये पेटलेल्या दंगलीने देश हादरला. त्यामुळे या संवेदनशील शहरात पोलिसांसमोर रोज एक आव्हान उभे राहताना दिसत आहे. मालेगावमधील पवारवाडीतील मेहवीनगर येथे दोन कुटुंबात पूर्व वैमनस्य आहे. त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. हे प्रकरण थेट भांडणापर्यंत गेले. या भांडणांनी इतके टोक गाठले की, एका व्यक्तीने समोरच्याच्या मनगटावर शस्त्राचा वार करून हात तोडला. या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. त्यात संशयिताने धूम ठोकली.
    हाताचा पंजा झाला निकामी…
    हाताचा पंजाच निकामी झाला, तर कसे…हा विचार सुद्धा करवत नाही. मात्र, भांडण करताना बेभान झालेल्या व्यक्तीला याची जाण असेलच, हे सांगता येत नाही. राग भीक माग म्हणतो, अगदी तसे झाले. समोरच्या व्यक्तीने केलेल्या शस्त्राच्या एका घावात पंजा तुटला. जखमी व्यक्तीवर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी फरार संशयिताचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. पोलिसांची पथके संशयिताच्या मागावर आहेत. मात्र, झाल्या प्रकाराने परिसरात एकच दहशत निर्माण झाली आहे. ही गुंडगिरी थांबवावी, अशी मागणी सामान्यांतून होत आहे.
    राग ठेवा नियंत्रणात…
    मालेगावमधील ही घटना सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडणारी आहे. अनेकदा आपण किरकोळ कारणावरून हुज्जत घालतो. शब्दाला शब्द वाढत जातो. साध्या-साध्या आणि दुर्लक्ष करता येण्यासारख्या प्रश्वावरही पोटतिडकीने भांडतो. हा वाद विकोपाला गेला की, भल्या-भल्या सभ्य माणसांच्या हातून देखील रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते. अनेकदा इतर ठिकाणचा राग भलत्याच ठिकाणी बाहेर पडतो. त्यामुळे सगळाच घोळ होतो.थोडा जरी संयम पाळला, तर बरेच काही आक्रित टाळले जाऊ शकते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Varangaon:वरणगावात वृद्धावर लोखंडी रॉडने धोकादायक हल्ला

    March 13, 2026

    Malkapur:मलकापूरमधील सर्पमित्राचा दुर्दैवी अंत

    March 13, 2026

    Jalgaon : भारत मुक्ती मोर्चा जळगावात शांततामय पण ठाम आंदोलन

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.