दोन वर्षानंतर सोयगाव ईदगाह मैदानात गजबज

0
9
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून मुस्लिम समाज बांधवांचा सर्वात मोठा सण ईद हा समाज बांधवांनी घरातच साजरा केला होता.माञ यंदा कोरोनानियम रद्द करण्यात आल्याचे यंदा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी ८ वाजता  सोयगाव येथील  मशिद येथुन सर्व समाज बांधव ईदगाह मैदानाकडे निघाले होते. ९ वाजता ईदच्या विशेष नमाजीचे पठण करण्यात आले. यानंतर एकमेकांची गळाभेट घेवुन शुभेच्छा देण्यात आल्या दरवर्षीप्रमाणे यंदाही  हिंदू बांधवांनी सर्वाची गळाभेट घेवुन शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना तालूका अध्यक्ष आबा काळे , पोलीस सहाय्यक निरीक्षक सुदाम सिरसाठ,नगरध्यक्ष अक्षय काळे, राजुभाऊ दुतोंडे, किशोर मापारी, दिपक पगारे,भगवान जोहरे,हर्षल काळे,लतिफ शहा, दिलीप देसाई,रमेश गव्हाडे, भगवान वारंगणे,कदीर शहा, , शेख जावेद,शरीफ शहा, किशोर मापारी, संदीप चौधरी, ईश्वर सोनवणे, समद शहा सह मोठ्या संख्येने इतर धर्मिय नागरीक उपस्थित होते. यावेळी सोयगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित, पो कॉ.सागर गायकवाड, रवींद्र तायडे,  पो. कॉ रोकडे आदींनी  चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here