देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण

0
10

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । देशात करोना महामारीची तिसरी लाट आली असून, सर्वसामान्यांपासून ते अगदी मंत्र्यांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

राजनाथ सिंह यांनी स्वत: ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. माझी आज सौम्य लक्षणांसह करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी होम क्वारंटाईनमध्ये आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी स्वत:चे विलगीकरण करून घ्यावे आणि तपासणी करून घ्यावी. असं राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे.

देशात करोना बाधितांच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे आणि या महिन्याच्या अखेरीस ते करोनाटी तिसरी लाट पीकवर असेल. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक महेंद्र अग्रवाल म्हणाले की, या काळात देशात दररोज ४ ते ८ लाख रुग्ण संख्या आढळू शकते. इतकेच नाही तर कडक निर्बंधांमुळे ही लाट काही काळानंतर नक्कीच येईल, पण नंतर ती दीर्घकाळ राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. लॉकडाउनसारख्या निर्बंधांशिवाय करोना विषाणूचा संसर्ग थांबणार नाही, हे या अंदाजावरून स्पष्ट होते. याशिवाय गतवर्षीप्रमाणे या लाटेत आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here