बोदवड़ प्रतिनिधी
शिवसेनेच्या नेत्या दिपाली सैय्यद नावाच्या एका महिलेने भारत देशाच्या महत्त्वाच्या संवैधानिक पदावरील व्यक्ती पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींजी विषयी काही वादग्रस्त विधाने केलीत हे खरंच खूप भयानक आहे जर मोदींना मारायची त्यांची गाडी फोडायची “धमकी” वजा “इशारा” जर या श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात दिली जात असेल तर हा राष्ट्रद्रोह का समजू नये तसेच अश्या लोकांवर गुन्हा दाखल करून कारवाई का होवू नये माननीय नरेंद्रभाई मोदीजी ते कुण्या एका पक्षाचे पंतप्रधान नाहीत किंवा एका राज्याचे मुख्यमंत्री ही नाहीत ते संपूर्ण भारत देशाचे नेतृत्व उत्तमरित्या सांभाळणारी एक जबाबदार व्यक्तीमत्व आहेत आणि हे भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगातील देशांनाही माहिती आहे.
जर मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध बोलले तर केंद्रीय मंत्री नारायण राणे, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांना अटक होऊ शकते तर या महिलेला पंतप्रधानांच्या विरुद्ध बोलल्याने कारवाई करून अटक का होवू नये
त्या महिलेने केलेले विधान हे चुकीचे,असभ्य व गैर आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा बोदवड़ तर्फे दिपाली सैय्यद विरुद्ध बोदवड़ पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी महिला मोर्चा तर्फे करण्यात आली आहे.
त्यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाउपाध्यक्षा अनिताताईं अग्रवाल, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा वैशालीताईं कुलकर्णी, तालुका सरचिटणीस सुरेखाताईं शर्मा, ललीताताईं चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष प्रभाकरभाऊ पाटिल, ता.सरचिटणीस राजेंद्रभाऊ डापसे, शहराध्यक्ष नरेशभाऊ आहुजा, सोशल मिडिया सह संयोजक उमेशभाऊ गुरव, संजयजी अग्रवाल आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती सोशल मीडिया तालुकाध्यक्ष रोहीत अग्रवाल यांनी कळवली.