मुंबई: प्रतिनिधी
सध्या कारागृहात असलेले मंत्री नवाब मलिक आणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार का! याचा फैसला बुधवार ता.8 रोजी होणार आहे.
सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) केलेल्या आरोपांमुळे मंत्री मलिक व माजी मंत्री देशमुख सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. या दोन्ही नेत्यांनी न्यायालयात अर्ज करून मतदानासाठी परवानगी मागितली आहे.
दोन्ही नेत्यांच्या अर्जावर उत्तर देण्यासाठी ईडीने वेळ मागितला आहे. या दोन्ही अर्जांवर ईडीने बुधवारपर्यत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. येत्या 8 जुन रोजी यावर सुनावणी आहे.
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी राज्यसभेसाठी मतदान करता यावे म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केले होते. हे दोघे राष्ट्रवादीचे नेते असून राज्यसभा निवडणुकीत आमदार म्हणून मतदानाचा हक्का बजावता यावा. मतदान करण्यासाठी सहभागी होता यावे.यासाठी दोघांनीही न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हे दोन्ही नेते सध्या आर्थर रोड कारागृहामध्ये आहेत.