देवेंद्र फडणवीसांचे फोटो पाहून एकनाथ खडसेंनी गायले ‘हे’ गाणे; किरीट सोमय्यांनी साधली चुप्पी

0
8

मुंबई : प्रतिनिधी 

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ) यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष पेटला आहे. फडणवीस यांच्यावर नाराजी दर्शवतच खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला.मात्र भाजपच्या सहकाऱ्यांसोबत खडसे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहे.

प्रशांत दामलेंच्या ‘किचन कल्लाकार’ या शोमध्ये नाथाभाऊ आणि किरीट सोमय्यांनी  हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील एका भागात राजकीय नेत्यांचे फोटो दाखवून त्यांबद्दल एक गाणं गाण्याचा टास्क एकनाथ खडसेंना दिला होता. त्यावेळी, देवेंद्र फडणवीसांचा फोटो त्यांना दाखविण्यात आला. त्यावर, एकनाथ खडसेंनी हिंदी चित्रपटातील गाणं गायले. . दुश्मन ना करे दोस्त ने जो काम किया है., हे गाणे एकनाथ खडसेंनी म्हटले. यावेळी, किरीट सोमय्यांनी मात्र चुप्पी साधली होती.

 

दरम्यान भाजपमध्ये एकनाथ खडसेंनी 40 वर्षे काम केले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रीपद सोडावे लागले. विशेष म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपकडून तिकीटही देण्यात आले नाही. भाजपाकडून होणारी पिळवणूक लक्षात घेता खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here