Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»दुचाकी अपघातात तरुण ठार
    क्राईम

    दुचाकी अपघातात तरुण ठार

    SaimatBy SaimatApril 7, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी
    येथील २० वर्षीय तरुण भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी पूर्व परीक्षा देवून घरी जात असतांना तालुक्यातील नेरी गावा दरम्यान, महिंद्रा पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत युवकाच्या डोक्याला जबरी मार लागल्याने तो जागेवरच ठार झाल्याची घटना घडली आहे.
    सविस्तर वृत्त असे की, तेजस सुरेश महेर (वय – २० ) असे मृत तरुणाचे नाव असून तेजस कन्नड तालुक्यातील नागद गावाजवळील पांगरे या छोट्याशा गावात राहत होता. तेजसला सैन्यात भरती होण्यासाठी जळगांव येथे गुरुकुल अकॅडमीत प्रवेश घेतला होता. अकॅडमीत सैन्यभरती पूर्व परीक्षाचा शेवटचा पेपर देवून दि. ६ एप्रिल रोजी तेजस हा पाचोरा तालुक्यातील लोहटार येथे मुक्कामी थांबला होता. दि. ७ एप्रिल रोजी गुरुवारी सकाळी लोहटार येथून नातेवाईकांची मोटारसायकल घेऊन पांगरे ता. कन्नड येथे जात असतांना चाळीसगाव तालुक्यातील भामरे गावाजवळ मालवाहू महिंद्रा पिकअप या चारचाकी वाहने मागवून त्यास जोरदार धडक दिली. वाहनाच्या जोरदार धडकेने तेजस हा जागेवर कोसळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि तो जागेवरच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच भामरे गावातील काही नागरीकांनी घटनास्थळी धाव घेऊन चारचाकी वाहन चालकास चांगलाच चोप देऊन तेजस महेर यांचेकडील असलेल्या मोबाईल वरून त्याचे बहिणीला फोन केल्यानंतर मयताची ओळख पटली.नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात येवून एकट हंबरडा फोडला. तेजस याचे पाश्चात्य आई, वडिल व एक बहिण असा परिवार असून तेजस हा आई – वडिलांना एकुलता एक मुलगा होता. . तेजसवर पांगरा ता. कन्नड येथे सायंकाळी नयन आश्रूंनी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मात्र तेजसचे सैन्यात भरती होवून देशसेवा करण्याचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले.
    दरम्यान, या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरचा गुन्हा शुन्य क्रंमाकाने कन्नड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. मयताचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.