Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»दुचाकींची धडक : तिघांचा मृत्यू तर एक गंभीर
    क्राईम

    दुचाकींची धडक : तिघांचा मृत्यू तर एक गंभीर

    SaimatBy SaimatJune 2, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी
    दोन दुचाकीची समोरा-समोर धडक झाल्याने त्यावरील तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे.

    मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील देऊळगाव गुजरी ते धामणगाव बडे या गावांच्या दरम्यान रात्री सुमारे नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात समोरा-समोरून येणार्‍या दोन मोटारसायकलींची धडक झाली. या अपघातामध्ये देऊळगाव गुजरी येथील प्रवीण नामदेव माळी ( वय४५) आणि त्यांचा मुलगा अतुल प्रवीण माळी ( वय १७) हे एका दुचाकीवरील बाप-लेक जागीच ठार झालेत. तर दुसर्‍या दुचाकीवर असणारा विलास भगवान गव्हाळ (वय २८, रा. खेडी पन्हेरी, ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा ) हा युवक देखील ठार झाला. तर देऊळगाव गुजरी येथील खालीद जमशेद तडवी हे यात जखमी झाले आहेत.

    हा अपघात घडल्याची माहिती मिळाल्यानंतर देऊळगाव गुजरीसह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पहूर पोलीस स्थानकाचे निरिक्षक प्रतापराव इंगळे यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले. तर या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या खालीद तडवी यांना उपचारासाठी जळगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या भीषण अपघतातात माळी पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याने देऊळगाव गुजरी परिसरावर शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगाव पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोलीस ठाण्यात हाणामारी

    March 14, 2026

    Nashirabad:नशिराबाद पेठ परिसरात दुचाकी जाळणाऱ्या टोळीवर पोलिसांचा ठोस कारवाईचा हात

    March 14, 2026

    Pahur : भराडी शाळेत बालआनंद मेळावा, विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेत चमक दाखवली

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.