विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी
जरंडी येथील तरुण व्यावसायिक तसेच शेतकरी गोविंद चत्रू राठोड(40) यांचे रविवार दी,२९ रोजी सायंकाळच्या वेळेस जळगाव येथे उपचारादरम्यान निधन झाले त्यांच्यावर चाळीस दिवसापासून उपचार सुरू होते सोयगाव- बनोटी रस्त्यावरील सुकी नदी(रामपूर तांडा फाट्या जवळ अपघात झाला होता चाळीस दिवसांच्या उपचारादरम्यान त्यांचा आज जळगाव येथे मृत्यू झाला त्यांच्यावर उद्या जरंडी येथे अंत्ययसंस्कार होणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे जरंडी येथील माजी सरपंच अमृत चत्रू राठोड यांचे ते लहान बंधू होते, त्यांच्या निधनाची वार्ता कळताच जरंडीगावासह परिसरात शोककळा पसरली आहे.