विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
केंद्र सरकारचे कामगार कष्टकरी विरोधी धोरनाच्या विरोधात कामगार ,कष्टकरी विद्यार्थी ,युवक महिला वर्ग रस्त्यावर उतरला आहे ,कृषी कायद्याप्रमाणे संसदेत कोनतीही चर्चा न करता संपूर्ण संसदीय लोकशाही प्रक्रिया धाब्यावर बसवून केंद्र सरकारने अजून एक घातक पाउल उचलले आहे ,गेल्या एक शतकापासून कामगारांनी लढुन मिळवलेल्या कामगार कायद्यांना उद्ध्वस्त करुन केंद्र सरकारने नवीन चार श्रम संहिता (कोड बिल )मंजूर करून घेतले आहेत, त्यामुळे कामगार कायदे नष्ट होऊन मालक धार्जिने कायदे अस्तित्वात आले आहे त्यामुळे किमान वेतन ,कामाचे तास ,औद्योगिक कलह ,सामुहिक वाटाघाटी ,कामगार संघटना नोंदित करण्याचा अधिकार आदी बाबतीत कामगारांच्या अधिकारावर गदा आली आहे,खाजगीकरण ,कंत्राटीकरन , महागाई ,बेरोजगारी च्या विरोधात दि 28, मार्च 2022 रोजी क्रांती चौक परिसरात सीटूच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली आहे ,या संपात औरंगाबाद जिल्ह्यातील सीटूच्या सर्व युनियन, संघटित कामगार,असंघटित कामगार ,कंत्राटी ,निम ,अप्रेंटिस ,योजना कर्मचारी ,आशा वर्कर्स ,शालेय पोषन आहार ,आरोग्य कर्मचारी ,अंगनवाडी कर्मचारी ,महानगरपालिका कर्मचारी ,बांधकाम कामगार ,रिक्षा वाले कामगार, ठेका मजदूर ,ट्रान्सपोर्ट कामगार,माथाडी कामगार , औरंगाबाद मजदूर युनियन ,तसेच अंतर्गत कामगार संघटनेतील लोम्बार्डिनी अ कोहलर कामगार संघटना ,फोर्बस कामगार संघटना ,ग्रेनॉच कामगार संघटना ,रँडिको कामगार संघटना ,उमेद अभियान महिला कामगार संघटना या संपात उतरले आहेत ,1070 पुरुष व महिलांची विषेश उपस्थिती निदर्शनास होती .विभागीय आयुक्त कार्यालय मार्फत ,मा पंतप्रधान ,भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले आहे ,आशा व गटप्रवर्तक यांनी पीएचसी वाईज मागण्या चे निवेदने देण्यात आली आहे ..
तसेच दि 29 मार्च रोजी वाळुज एमआयडीसी येथे दु 3 :30 वाजता महाराणा प्रताप चौक येथे निदर्शने करण्यात येणार आहेत व सीटू भवन औरंगाबाद येथे 12 वाजता कामगार व महिला आंदोलन करनार आहेत .
कॉ लक्ष्मण साकु्डकर ,कॉ दामोदर मानकापे ,कॉ मंगल ठोंबरे ,कॉ अजय भवलकर ,कॉ बस्वराज पटणे ,कॉ गोरखनाथ राठोड ,कॉ शंकर ननुरे ,कॉ विश्वनाथ शेळके ,कॉ दिपक आहिरे ,कॉ संजय गौकुंडे ,कॉ सतिष कुलकर्णी ,कॉ रमेश हाके ,कॉ पुष्पा पैठने,कॉ पुष्पा सिरसाट ,कॉ ज्योती भोसले ,कॉ जनाबाई नेटके ,शिवाजी पवार ,मनोहर सनेर ,कॉ किरण गायकवाड ,योगिता निकम ,आनिता मनगटे ,भाग्यश्री सोनवने ,आनिता कोकणे ,गुंगु छबिदार ,विमल सिरसाट ,सुनिता नागे ,अलका बोर्डे,कमल मोकळे ,काशिबाई जाधव ,वैषाली शिंदे ,मिरा सोनवने ,सुचित्रा घोडे ,परिघा खरात ,संजिवनी खरात ,मालती गवइ,शशिकला खंडांगळे ,मनिषा दांडगे , विविध कंपनीतील कामगार व महिला मोठ्या संख्येने या निदर्शनामधे सामिल होते .