पाळधी प्रतिनिधी
पाळधी बु ग्रामपंचायत तर्फे ग्रामपंचायत उत्पन्नामधून 5 टक्के निधी दिव्यागांना मदत म्हणून वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील म्हणाले की दिव्यागांना आपण मदत हा शब्द न वापरता सहकार्य म्हटले पाहिजे, दिव्यांग सुद्धा आपल्या समाजाचे अविभाज्य घटक आहेत. आपण हा निधी वाटप करून समाजाच्या या घटकाचे ऋण फेडत आहोत. पाळधी बु ग्रामपंचायत तर्फे सुमारे 25 दिव्यांग बंधू भगिनींना चेक वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच प्रकाश नाना पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुण माळी, अकबर पठाण, प्रकाश ठाकूर, तुषार मोरे, श्रीराम पाटील, रोहित शिरोळे, सर्व सदस्य व मान्यवर उपस्थित होते.