दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दरात वाढ; जाणून घ्या दर

0
15
जाणून घ्या दर : सोन्याच्या दरात घसरण सुरूच, तर चांदीच्या भावात वाढ

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । जागतिक संकेतानुसार सोमवारी दिल्ली सराफात सोन्याचे दर 182 रुपयांनी वाढून 47,023 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तयार चांदीचा दर मात्र 178 रुपयांनी कमी होऊ 64,721 रुपये प्रत्येक किलो झाला. सकाळच्या सत्रात रुपयाचे मूल्य 18 पैशांनी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली.

जागतिक बाजारात डॉलर घसरत असल्यामुळेही सोन्याचे दर वाढत असल्याचे दिसून येते असे एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,800 डॉलर व चांदीचा दर 24.48 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here