दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या

0
15

साईमत, धुळे, प्रतिनिधी

पती-पत्नीच्या किरकोळ वादाचे रूपांतर होऊन पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील मोहिदा येथे घडली.

नंदा पावरा व बाळू पावरा हे दांपत्य याठिकाणी वास्तव्यास आहे. आपल्या शेतातील घरात हे दाम्पत्य रहायचे. या दोघांमध्ये रात्री वाद झाला. या वादावेळी पती बाळू याने दारुच्या नशेत पत्नी नंदा हिच्या डोक्यात लाकडी दांडके मारले. यावेळी जबर मारहाण झाल्याने पत्नी नंदा (वय ३०) हिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोतवाल म्हणून काम करत असलेला मारेकरी पती बाळू पावरा (वय ४०) यास पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. नंदा पावरा यांचा मृतदेह पोलिसांनी तपासणीसाठी पाठविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here