मुंबई : प्रतिनिधी
बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता मागोमागच इयत्ता 10 वी परीक्षांचे निकालही जाहीर झाले आहेत. शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करण्यात आला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा घेण्यात आल्याचे सांगत शिक्षण मंडळांकडून सुरुवातीला काही मुद्दे स्पष्ट करुन सांगण्यात आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आले आहेत.
नऊ विभागीय मंडळातून 15 लाखांहून अधिक नियमित विद्यार्थ्यांनी या परिक्षेसाठी नोंदणी केली होती. एकूण 96.94 टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. यंदाच्या परीक्षांमध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर मुलींनी यंदाही बाजी मारली.
एकूण परीक्षार्थी : 15 लाख 68 हजार
उत्तीर्ण विद्यार्थी ः 15 लाख 21 हजार 3
उत्तीर्णतेची टक्केवारी : 96.94
विद्यार्थी : 96.06
विद्यार्थिनी : 97.96
प्रावीण्य श्रेणी : 650779
प्रथम श्रेणी : 570027
द्वितीय श्रेणी : 258027
उत्तीर्ण श्रेणी : 42170
100 टक्के निकालाच्या शाळा : 12 हजार 210
विभागनिहाय निकाल
पुणे : 96.96 टक्के
मुंबई : 96 94 टक्के
कोकण : 99.27 (सर्वाधिक)
अमरावती : 96.81 टक्के
नागपूर : 97 टक्के
औरंगाबाद : 96.33 टक्के
कोल्हापूर : 98.50 %
नाशिक : 95.90 टक्के
(सर्वात कमी)
लातूर : 97.27 टक्के