Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»दमदार फीचर्ससह OnePlus चा बहुचर्चित स्मार्ट टीव्ही भारतात लाँच, आता मोठ्या स्क्रीनवर घ्या चित्रपटाचा आनंद
    Uncategorized

    दमदार फीचर्ससह OnePlus चा बहुचर्चित स्मार्ट टीव्ही भारतात लाँच, आता मोठ्या स्क्रीनवर घ्या चित्रपटाचा आनंद

    SaimatBy SaimatApril 7, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     OnePlus ने आपल्या बहुचर्चित Y1 सीरिजमधील नवीन स्मार्ट टीव्हीला भारतीय बाजारात लाँच केले आहे. OnePlus TV Y1S Pro हा वॅनिला Y1S च्या तुलनेत अपग्रेडेड डिस्प्लेसह येतो. ४के डिस्प्लेसह OnePlus TV Y1S स्मार्ट टीव्हीमध्ये २४ वॉट स्पीकर, अँड्राइड १० आणि २ जीबी रॅमसह अनेक शानदार फीचर्स दिले आहे. OnePlus TV Y1S Pro चे स्पेसिफिकेशन्स जवळपास OnePlus TV Y1S सारखेच आहेत. कंपनीने या स्मार्ट टीव्हीला ३० हजार रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केले आहे. दमदार फीचर्ससह येणाऱ्या OnePlus TV Y1S Pro स्मार्ट टीव्हीच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

    OnePlus TV Y1S Pro ची किंमत आणि फीचर्स

    OnePlus TV Y1S Pro ला भारतीय बाजारात २९,९९९ रुपये किंमतीत सादर केले आहे. स्मार्ट टीव्हीला Amazon इंडिया, वनप्लसची अधिकृत वेबसाइट, ब्रँडचे प्रमुख स्टोर व देशभरात अन्य रिटेल आउटलेट्सच्या माध्यमातून खरेदी करू शकता. Amazon वरून टीव्ही खरेदी करताना एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला २,५०० रुपयांपर्यंत डिस्काउंटचा देखील फायदा मिळेल. OnePlus TV Y1S Pro मध्ये ४३ इंच ३के डिस्प्ले दिला असून, हा HDR१०+ सपोर्टसह येतो. डिस्प्लेच्या चारही बाजूला पातळ बेझल्स आहेत. टीव्ही एमईएमसी, कंटेंट ऑप्टिमायझेशन, डायनॅमिक कॉन्ट्रॅस्ट आणि शानदार कलर रिप्रोडक्शनसह एआय-पॉवर्ड व्हिज्यूअल्ससह येतो. यात डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह २४ वॉट स्पीकर दिले आहेत.

    OnePlus TV Y1S Pro मध्ये मीडियाटेक MT९२१६ प्रोसेसरसह २ जीबी रॅम आणि ८ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज दिले आहे. यामध्ये गुगल सपोर्ट आणि Google Chromecast सपोर्ट मिळतो. हा टीव्ही Android 10 TV OS वर काम करतो. यामध्ये Amazon Prime व्हिडिओ, Disney+ Hotstar आणि Netflix सारखे अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल आहेत. तसेच, वनप्लसच्या अन्य डिव्हाइसशी कनेक्ट करण्यासाठी यात वनप्लस कनेक्ट २.० चा सपोर्ट दिला आहे. टीव्हीमध्ये ब्लूटूथ ५.० सपोर्ट, १ ईथरनेट पोर्ट, २ एचडीएमआय २.० पोर्ट, २ यूएसबी २.० पोर्ट आणि ड्यूल बँड वाय-फाय सारखे फीचर्स दिले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Malkapur : पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा तहलका

    December 9, 2025

    Malkapur : मलकापुरात दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लंपास

    December 9, 2025

    Bangladesh Earthquake : बांगलादेश भूकंपाने हादरला: 6 मृत, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली

    November 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.