‘त्या ‘  शिवसैंनीकांविरुद्ध गुन्हा दाखल

0
49

जळगाव प्रतिनिधी 
शहरातील एका व्यक्तीने सोशल मीडियात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केली होती. शिवसैनिकांनी रविवारी त्या व्यक्तीला गाठत खान्देश सेंट्रल परिसरात चोप दिला होता. याप्रकरणी हेमंत दुतिया यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशीकी, धरणगाव येथील हेमंत नवनीतलाल दुतिया यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार, रविवारी  हेमंत दुतिया पत्नी, मुलगी आणि सासऱ्यांसह जळगावातील आयनॉक्स चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी आले होते. चित्रपट सुटल्यानंतर ते बाहेर आल्यावर ६.४५ च्या सुमारास त्यांना गुलाब रतन वाघ, विष्णू भंगाळे, राजेंद्र महाजन, धिरेंद्र पुरभे, गजानन मालपुरे, शरद तायडे, शोभा चौधरी, सरिता माळी (कोल्हे), भीमा धनगर यांच्यासह ४-५ जणांनी फेसबुकवर पोस्ट का टाकली म्हणून मारहाण केल्याचे म्हटले आहे. फिर्यादी म्हटले आहे की,  मी कोणतीही पोस्ट टाकली नसताना देखील त्यांनी आरोप घेऊन मारहाण केली. माझी पत्नी गौरी ही सोडविण्यासाठी आली असता तिच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र पडून नुकसान झाले आहे. तसेच तिच्या हाताला देखील मार लागला आहे. मला झालेल्या मारहाणीत माझ्या नाकातून रक्त येऊ लागले. सर्वांनी मला जीवे मारण्याची देखील धमकी दिल्याचे म्हणत फिर्याद देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here