मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे २९ आमदारांसह सुरतमधील एका हॉटेमध्ये आहे. शिंदे हे सध्या कोणाच्याही संपर्कात नाही. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. तसेच शिंदे कोणाच्याही संपर्कात नसल्याने ते बंडाच्या तयारी असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे शिवसनेच्या गोटात खळबळ निर्माण झाली. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात केलेल्या ट्विटमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.
“शाब्बास एकनाथजी, ….नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”, असे ट्वीट नारायण राणे यांनी केल्याने उलट -सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला असताना एकनाथ शिंदे अचानक गायब झाले असल्याने चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवारी विजयी झाले असताना शिवसेना आणि काँग्रेसची मतं फुटली आहेत. त्यातच एकनाथ शिंदेशी संपर्क होत नसल्याने त्यांनी बंड पुकारल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
