जळगाव प्रतिनिधी
जळगाव येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने तीस हजाराची लाच घेताना कार्यालयात अटक केली आहे जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सिक्युरिटी गार्ड च्या नोकरी साठी जळगाव जिल्ह्यातील एका व्यक्तीने अर्ज केला होता कार्यालयात कार्यरत असणारे शिपाई चौधरी याने दोन लाख दहा हजार रुपयांची मागणी केली होती, तर पहिला हप्ता तीस हजार रुपये देण्याचे ठरले. अर्जदाराने थेट तिथून निघून लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे आपली तक्रार नोंदवली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापडा रचून या शिपाईला तीस हजारची लाच घेताना रंगेहात पकडले.