तालिबान्यांनी अमरुल्ला सालेह यांच्या भावाला केले ठार

0
15

काबुल, वृत्तसंस्था । अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष आणि स्वत:ला राष्ट्राध्यक्ष घोषित करणारे अमरुल्ला सालेह यांच्या भावाला तालिबान्यांनी ठार केल्याची माहिती समोर येत आहे तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा मिळवला आहे, मात्र पंजशीरमध्ये अद्यापही संघर्ष सुरु आहे. याच संघर्षादरम्यान अमरुल्ला सालेह यांचा भाऊ रोहुल्लाह सालेह ठार झाला आहे. तालिबानने रोहुल्लाह सालेह याची ओळख पटल्यानंतर त्याचा छळ करुन नंतर फासावर लटकवले अशी माहिती आहे.

रोहुल्लाह सालेहचा भाचा इबदुल्लाहने तालिबान यावेळी वारंवार मृतदेह सडला पाहिजे म्हणत होते असे सांगितले आहे.“त्यांनी गुरुवारी हत्या केली असून आम्हाला दफन करण्यासाठीही मृतदेह देत नाही आहेत.ते वारंवार मृतदेह सडला पाहिजे असे म्हणत आहेत,” असे इबदुल्लाहने सांगितले असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

तालिबानने पंजशीरचा पूर्ण ताबा मिळवला असल्याचा दावा केला आहे मात्र प्रतिकार गटाने हा दावा फेटाळून लावला आहे. काही रिपोर्टनुसार,पंजशीरमध्ये प्रतिकार गटाचे नेतृत्व करणारा अहमद मसूद आणि अमरुल्ला सालेह तालिबानने पंजशीरचा ताबा मिळवल्यानंतर देश सोडून ताजिकिस्तानला पळून गेल्याचा दावा आहे मात्र ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तान सरकारचे राजदूतांनी हा दावा फेटाळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here