साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील तहजीब नॅशनल उर्दु शाळेत पाचवी ते आठवीला भेटलेले शिक्षक हे एक संचालक व मुख्याध्यापक यांनी आपल्या सोयीसाठी नववी ते दहावीला शिक्षक दिले आहे. शाळेत सद्यस्थितीला पाचवी ते आठवीला जास्त शिक्षकांची गरज आहे. पाचवी ते आठवीच्या प्रत्येक वर्गात १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या आहे. मात्र, तिथे एका संचालक आणि मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभारामुळे शिक्षक दिले गेलेले नाही, अशी काही पालकांनी माहिती दिली. त्यामुळे शाळेतील मनमानी कारभाराची संबंधितांनी चौकशी करावी, अशी मागणी सुज्ञ पालकांनी केली आहे.
अँग्लो उर्दु शाळा आणि तहजीब नॅशनल उर्दु शाळा या दोघी शाळेत शहरातील मुस्लिम समाजाच्या मुलांचे शिक्षण डीएड, बीएड झाले आहे. त्यांना भरती केली पाहिजे. आपल्या शहरातील विद्यार्थी शिक्षक झाल्यावर दोघी उर्दु शाळा व्यवस्थित चालवतील. मग संचालकांचा मनमानी कारभार चालणार नाही, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते आदिल चाऊस यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ दिली. तहजीब उर्दु शाळेतील अकरावीच्या पुस्तकाचे सेट बाहेर बाजारातील पुस्तकांच्या दुकानात सहाशे रुपयाला मिळते. याच शाळेतील एक शिक्षक आठशे रुपयाला विक्री केल्याची माहिती एका पालकांनी दिली. या शिक्षकाने किती विद्यार्थ्यांकडून आठशे रुपयाप्रमाणे पैसे आगाऊ घेतले आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पालकांनी केली आहे.
पुस्तके विक्रीचीही चौकशीची मागणी
मालेगाव आणि चाळीसगावहुन शेवटी पाच ते सहा विद्यार्थ्यांनी सहाशे रुपयात पुस्तक खरेदी केली. तहजीब उर्दु शाळेचे एक संचालक आणि मुख्याध्यापक, पुस्तकाचे जास्त आकारणारे शिक्षक व खासगी क्लासेस घरी घेत आहे. असे शिक्षक आणि खिचडी ठेकेदार, शाळेचा गणवेश रंग बदलला. मात्र, ठेका दिलेल्या दुकानावर गणवेश अद्याप आलेले नाही, असे समजते. त्याचीही चौकशीची मागणी काही पालकांनी केली आहे.