तरुणीला लैंगिक सुखाची मागणी करणाऱ्या चौघांना अटक

0
35

जळगाव : प्रतिनिधी
शहरात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या १९ वर्षीय युवतीला लैंगिक सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली असून चौघांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या १९ वर्षीय पिडीत तरुणी आहे. जळगाव शहरातील एका महाविद्यालयात ती शिक्षण घेत आहे. दरम्यान ११ जानेवारी ते १३ मे दरम्यान पिडीत मुलीला देवेंद्र भागवत पाटील (वय-२१) रा. नायगाव ता.यावल, अजय मनोज माळी (वय-२०) रा. तळेगाव ता. जामनेर, कमलेश भटू भामरे (वय-१९) रा. सुराजय ता. शिंदखेडा जि.धुळे आणि अभिषेक रमेश बाविस्कर (वय-१९) रा. फर्दापूर ता. सोयगाव जि. औरंगाबाद यांनी वेळोवेळी तरूणीशी अंगलट करत उघडपणे लैंगिक सुखाची मागणी करत होते. या छळाला कंटाळून तरूणीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here