जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील हनुमान नगर परिसरता एका 21 वर्षीय तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर असे की, शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील हनुमान नगरात ज्ञानेश्वर अर्जुन पाटील(वय 21) या तरूणाने काल दि.1 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घरात कोणी नसतांना छताला दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण मात्र समजले नाही. शहरातील फुले मार्केट येथे ज्ञानेश्वर एका भांड्यांच्या दुकानात कामाला होता. त्याच्या पश्चात आई, वडिल, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास पो.ना.दत्तात्रय बडगुजर करीत आहे.