तमाशात गोंधळ घालणार्‍यांना आठ वर्षानंतर न्यायालयाने केले निर्दोषमुक्त 

0
10
पाचोरा (प्रतिनीधी): तालुक्यातिल शिंदाड गावात आठ वर्षांपुर्वी याञेनिमित्त गावात आलेल्या तमाशामध्ये गोंधळ घातला म्हणुन गावातिल 16 जणाविरुध्द गून्हा नोंदवण्यात आला होता.या प्रकरणी पाचोरा न्यायालयाने निकाल दिला असुन सर्व आरोपिंना निर्दोषमुक्त करण्यात आले आहे.न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे शिंदाड गावासह परिसरात स्वागत होत आहे.
तालुक्यातिल शिंदाड येथे  2012 चे डिसेंबर महिन्यात गैबानशा बाबा यांच्या उरूस निमित्त याञेचे आयोजन गेल्या अनेक वर्षापासुन केले जात आहे.याञेनिमित्त करमणुकिसाठी  तमाशाचा  कार्यक्रम होत असतो.2012 असाच तमाशाचा कार्यक्रम सुरू असतांना काही नागरिकांनी गोंधळ घालून तमाशा कलावंत स्त्री पुरुषांना मारहाण केली म्हणून पिंपळगाव( हरेश्वर )पोलिस स्टेशनमध्ये  प्यारेलाल वाघ यांच्या तक्रारीवरून 16 जणांविरूध्द गुन्हा  नोंदविण्यात आला होता. 2015 पासून हे प्रकरण पाचोरा न्यायालयात न्यायमूर्ती सिद्दीकी साहेबांच्या न्यायालयात चौकशीला होते. यात फिर्यादी पक्षातर्फे फिर्यादी व घटनेतील साक्षीदार महिला कलावंत यांचे जाब जबाब झाले.  आरोपींतर्फे अॅड. अभय शरद पाटील व अॅड दिपक पाटील यांनी काम पहिले तर सरकार पक्षातर्फे अॅड माने यांनी काम पहिले. उभय  पक्षातर्फे आपली बाजू मांडल्यानंतर न्यायमूर्ती यांनी आज  18 जानेवारी रोजी  सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. गेल्या आठ वर्षांपूर्वी या तक्रारीने महाराष्ट्रात चांगलेच चर्चेला उधाण आले होते. मात्र आजच्या निकालाने यात अडकलेल्या व नोकरी साठी पात्र असलेल्या अनेक युवकांना दिलासा मिळालेला आहे.  तसेच आठ वर्षापूर्वी गावातील राजकीय खेळितून या निष्पाप युवकांना अडकविण्यात आले होते त्यांना न्याय मिळाल्याची चर्चा नागरिक करत आहेत.या निकालाचे सर्वस्थरातुन स्वागत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here